शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

समितीचा अहवाल आठवड्याभरात

By admin | Updated: July 19, 2014 03:32 IST

अनधिकृत बांधकामप्रश्नी, तसेच शास्तीविषयी तोडगा काढण्याबद्दल स्थापन केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.

पिंपरी : अनधिकृत बांधकामप्रश्नी, तसेच शास्तीविषयी तोडगा काढण्याबद्दल स्थापन केलेल्या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात अपेक्षित आहे. अहवाल आल्यानंतरच निर्णय घेता येईल, अशी चर्चा मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत झाली.पिंपरी-चिंचवडमधील शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु अनधिकृत बांधकामांसदर्भात मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली १४ महापालिकांच्या आयुक्तांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून पुढील आठवड्यात अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत अनधिकृत बांधकामे नियमितीकरण आणि २००८ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीबाबत निर्णय घेता येत नाही. समितीच्या अहवालावर पुढील निर्णय घेण्याचे धोरण निश्चित होईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी या बैठकीत स्पष्ट केले.बैठकीस आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर शरद मिसाळ, आमदार विलास लांडे, नगररचना विभागाच्या उपसंचालक प्रतिभा भदाणे, पर्यावरण अभियांत्रिकी कक्षाचे अधिकारी संजय कुलकर्णी, नगरसेवक प्रशांत शितोळे, शांताराम भालेकर आदी उपस्थित होते. शास्तीबाबत शासनस्तरावर निर्णय होत नाही, तोपर्यंत नागरिकांकडून मूळ मिळकतकर महापालिकेने घ्यावा, प्राधिकरणातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या घरांसाठी दीड चटई क्षेत्र निर्देशांक (वाढीव एफएसआय) मान्य करावा, आकुर्डी रेल्वेस्टेशन येथील बसथांब्यासाठी प्राधिकरणाने भूखंड महापालिकेच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी पालिका पदाधिकाऱ्यांनी केली. त्यास तत्त्वत: मान्यता दिली. स्पाइन रस्त्यासाठी पालिकेने ११ कोटी प्राधिकरणास द्यावेत, प्राधिकरणाने हा रस्ता करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.(प्रतिनिधी)