शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पा ण्या चा पु न र्वा प र; ब च ती ची आ व श्य क ता

By admin | Updated: July 13, 2014 00:09 IST

एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या पुण्यावर एक दिवसाआड पाणी पुरवठय़ाची नामुष्की ओढविली आहे.

पुणो : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या पुण्यावर एक दिवसाआड पाणी पुरवठय़ाची नामुष्की ओढविली आहे. धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. पुण्यातील काही सोसायटय़ांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून पुणोकरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर,  रेनवॉटर हाव्रेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे. 
 
पुण्यातील काही सोसायटय़ांनी पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प उभारले आहेत. सांडपाण्याचा यातून पुरेपूर वापर होत आहे, यामुळे पाणीपट्टीत सवलत तर मिळणार आहेच, त्याचबरोबर पाण्याची बचतही होणार आहे. 
साधारण दर तीन वर्षानंतर पुण्यावर पाणी कपातीची आपत्ती ओढवते. या वेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. पुणो वाढतंय, लोकसंख्या वाढतीय. मात्र, पुण्यासाठीची पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी. 
 
सामूहिक जबाबदारी 
4सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा
4येत्या पावसाळ्य़ात छतावर पडणा:या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या
4जुने जलस्नेत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. 
4नैसर्गिक जलस्नेत व टेकडय़ांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून पुण्याची पुन्हा ‘ग्रीन सिटी’ ही ओळख निर्माण करावी. 
 
वैयक्तिक जबाबदारी 
4नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा.  
4आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढचे पाणी घ्यावे. 
4नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. 
4उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.
 
4नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणो राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल. ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे.  
आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती ‘लोकमत’ कार्यालयात पाठवा. पत्ता : व्हीया वेन्टेज, 1/2 मजला, सीटीएस 55/2, एरंडवणो, लॉ कॉलेज रोड, फिल्म इन्स्टिटय़ूटजवळ, पुणो 411 क्क्4, फोन (क्2क्) 66848586 (ई-मेल : ँी’’स्र4ल्ली’‘ें3.ूे)
- संपादक
 
पुणोकरांनो लक्षात ठेवा..
खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वानाच जाणवू लागली आह़े त्यात पावसाने ओढ दिल्याने पुणोकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आह़े पुणोकरांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत़ या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो़