प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेले म्हणून नातेवाइकांनी केले मुलाच्या वडिलांचे अपहरण;मारुंजी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:19 IST2025-04-11T15:19:23+5:302025-04-11T15:19:50+5:30

- पोलिस ठाण्यात दहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Relatives kidnap the boy's father for abducting the girl from a love affair; incident in Marunji | प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेले म्हणून नातेवाइकांनी केले मुलाच्या वडिलांचे अपहरण;मारुंजी येथील घटना

प्रेमप्रकरणातून मुलीला पळवून नेले म्हणून नातेवाइकांनी केले मुलाच्या वडिलांचे अपहरण;मारुंजी येथील घटना

पिंपरी : प्रेमप्रकरणातून एका मुलीला पळवून नेले. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी मुलाच्या वडिलांचे अपहरण केले. ही घटना मारुंजी येथे बुधवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

दिनेश रामनाथ चव्हाण (वय २५, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय राठोड, अंकुश राठोड, संदीप राठोड, उमेश राठोड व त्यांचे सात साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मारुंजीतील अक्षय निवास, सरकार चौक येथे आरोपी एका गाडीतून आले, त्यांनी आमच्या मुलीला तुझा भाऊ नीलेश याने पळवून नेले आहे. त्यांना आणून दे आणि तुझ्या वडिलांना घेऊन जा, असे म्हणत फिर्यादी व त्यांचे वडील रामनाथ यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला जिवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. फिर्यादीचे वडील रामनाथ (वय ५५) यांना जबरदस्तीने अपहरण करून नेले.

Web Title: Relatives kidnap the boy's father for abducting the girl from a love affair; incident in Marunji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.