Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:21 IST2026-03-12T12:19:12+5:302026-03-12T12:21:00+5:30

Pune Junnar Crime: आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केल्याची माहिती समोर येत असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे

Rejection of marriage; Student's face, neck attacked with a coyote, student seriously injured in a shocking incident in Junnar | Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

Pune Junnar Crime: पुण्याच्या जुन्नर शहरात असणाऱ्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावच्या युवकाने लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जुन्नर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्ला करणारा आरोपी पसार झाला असून जुन्नर पोलिस आरोपीचा तपास करत आहेत. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सकाळी वसतिगृहातून बाहेर पडली असता तिच्या मूळ गावचा असणारा युवक महेश मुरलीधर डामसे या युवकाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केल्याची माहिती समोर येत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलय. जखमी विद्यार्थी व आरोपी दोघेही एकाच गावातील रहिवाशी असून लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने सदर हल्ला केल्याचा जबाब जखमी विद्यार्थिनीने पोलिसांना दिला आहे. जुन्नर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Web Title : विवाह प्रस्ताव अस्वीकारने पर कुल्हाड़ी से हमला; जुन्नर में छात्रा गंभीर रूप से घायल।

Web Summary : पुणे के जुन्नर में एक कॉलेज छात्रा को एक युवक ने विवाह प्रस्ताव अस्वीकार करने के बाद कुल्हाड़ी से हमला कर दिया। छात्रा गंभीर रूप से घायल है। आरोपी फरार है और पुलिस जांच कर रही है।

Web Title : Rejection leads to axe attack; Junnar student critically injured.

Web Summary : In Junnar, Pune, a college student was brutally attacked with an axe by a youth after she refused his marriage proposal. The girl is critically injured. The accused is absconding, and police are investigating.