सुवर्णा गवारे, पिंपरीशासनाच्या नवीन योजनापासून नागरिक वंचित असतात. शहरामध्ये ग्राहकांना वीज बील भरणा सेवा देणारे एटीपी यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित असते. मात्र पिंपरीगाव व सांगवी येथील एटीपी वीज बील भरणा केंद्रातून एटीपी मशिनद्वारे खूप कमी प्रमाणात नागरिक लाभ घेताना दिसत आहेत.पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी (एमएसईबी) ने ग्राहकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाइन वीज भरण्याची सेवा व तसेच ए. टी. पी (२४ तास वीज बील भरणा सेवा)च्या माध्यमातून वीज बील भरण्याची सेवा ग्राहकांना पुरविली जात आहे. मात्र काही नागरिक या सुविधांचा लाभ घेत आहेत. तर काही नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत.ए. टी. पी चे यंत्रणेचे फ ायदे म्हणजे नागरिकांची वेळेची बचत व्हावी. नागरिकांच्या वीज बील भरण्यासाठी रांगाच्या रांगा लागतात. तसेच सोईस्कररित्या नागरिकांचे विना तक्रार वीज बील भरले जावे. शासकीय योजनांची माहिती नागरिकांना हवी. तसेच नागरिकांमध्ये या योजनांची जनजागृती होणे आवश्यक आहे. फ क्त सुशिक्षित नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे नाही. सर्वसामान्य घटकांनाही या योजनचा लाभ मिळावा मात्र नागरिक यापासून वंचित राहतात.पिंपरीगावातीलवीजेचा उपभोग घेणा-या ग्राहकांची संख्या १८ हजाराच्या आसपास आहे. व शहरातील वीजबील उपभोगता संख्या दोन लाख ८१ हजार आहे. या संख्येच्या तुलनेत सध्या पिंपरी-चिंचवड शहरातून पाच हजाराच्या आसपास नागरिक एटीपीच्या माध्यमातून वीज बील भरणा करतात. या शासकीय योजनांची माहिती महावितरण विभागामार्फत नागरिकांपर्यंत पोहचण्यास अपूरी पडत आहे. या योजनेचा आॅगस्ट ५०७७ ग्राहकांनी लाभ घेतला आहे अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम. आर. सांळुके यांनी दिली. एटीपी योजनेची नागरिकांना माहिती हवी. यासाठी शासकीय योजनांची माहितीचे समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. एमएसईबी अधिका-यांचे म्हणणे आहे की, काही कालावधीनंतर नागरिकांना या योजनेची माहिती होईल. सध्या सर्व ठिकाणी जे कर्मचारी वीजबील भरणा करून घेत आहेत त्यांनी नागरिकांना एटीपी मशिनची माहिती द्यावी.
‘एटीपी’द्वारे वीजबिल भरण्याकडे कल कमी
By admin | Updated: September 22, 2014 05:42 IST
शासनाच्या नवीन योजनापासून नागरिक वंचित असतात. शहरामध्ये ग्राहकांना वीज बील भरणा सेवा देणारे एटीपी यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित असते
‘एटीपी’द्वारे वीजबिल भरण्याकडे कल कमी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}