शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कमी; तक्रारीच जास्त

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे.

पुणो :  शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे. गेल्या दीड वर्षात शहरातील नागरिकांकडून पाणीपुरवठय़ाबावत तब्बल 53 हजार तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील जवळपास 49 हजार तक्रारींचे निवारण केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा असून, अद्यापही तीन हजार तक्रारींचे निवारण करण्यात महापालिका प्रशासनास यश आलेले नाही. 
गेल्या दशकभरात शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. या लोकसंख्येला  महापालिकेकडून  पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत गेल्या चाळीस वर्षात फारसा बदल झालेला नाही. त्यातच शहराचा आकार बशीसारखा असल्याने अनेक बहुतांश उपनगरे उंचवटय़ावर असल्याने सर्व ठिकाणी पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करणो प्रशासनास शक्य होत नाही. तसेच, त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटण्याचे प्रमाणही मोठे आहे. परिणामी, नागरिकांकडून महापालिकेवर तक्रारींचा पाऊसच गेल्या दीड वर्षात करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणो, पाणीच न येणो, जलवाहिनी फुटणो, पाणीगळती, गळकी नळकोंडाळी, टँकर न येणो, नियोजित वेळेपेक्षा कमी पाणी येणो अशा तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
 
दररोज 125 ते 13क् तक्रारी 
च्पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारी पाहता शहरात गेल्या एप्रिल 2क्13 ते जुलै 17 र्पयत पाणी पुरवठय़ाबाबत 52 हजार 963 तक्रारी आल्या आहेत. म्हणजे दरमहा सरासरी 3 हजार 783, तर दररोज 125 ते 13क् तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. 
च्या तक्रारी प्रामुख्याने स्वारगेट, लष्कर, तसेच एसएनडीटी जलकेंद्रांकडे, थेट अधिका:यांकडे, तसेच पालिकेस लेखी स्वरूपात करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तक्रारीमध्ये प्रमुख तक्रार कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
 
शहरात दर वर्षी उन्हाळयात पाणीकपात लागू करण्यात येते. या तक्रारींची संख्याही भरमसाट असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते 17 जुलै 2क्14 या कालावधीत सुमारे 7 हजार 9क्8 तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यातील 7 हजार 581 तक्रारींचे निवारण करण्यात आलेले असून, अद्यापही 327 तक्रारी पालिकेस सोडविता आलेल्या नाहीत. त्यात तक्रारीही प्रामुख्याने स्वारगेट आणि एसएनडीटी जलकेंद्राच्या बाबतीतच आहेत. 
 
सर्वाधिक 
27 हजार 38 
तक्रारी पेठांमधून 
च्पाणीपुरवठय़ांबाबत सर्वाधिक तक्रारी पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या शहरातील मध्यवर्ती भागांमधील पेठांमधून करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारी  स्वारगेट जलकेंद्राकडे करण्यात आलेल्या आहेत. 
 
च्त्यात पाणी कमी दाबाने येत असल्याच्याच सर्वाधिक तक्रारी आहेत. गेल्या 14 महिन्यांत सुमारे 27 हजार 38 तक्रारी या परिसरातून आलेल्या असून, 26 हजार तक्रारींचे निवारण केल्याची पालिका प्रशासनाची नोंद आहे.