शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भरती गैरव्यवहाराचा चेंडू शासनाकडे

By admin | Updated: August 3, 2015 04:12 IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. तसेच, संबंधित उमेदवाराकडे दावा केल्याप्रमाणे त्याच्याकडे आवश्यक

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. तसेच, संबंधित उमेदवाराकडे दावा केल्याप्रमाणे त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहे का? हे तपासले जाते. ती कागदपत्रे खरी की खोटी, हे तपासण्याचे काम शासनाच्या संबंधित विभागाचे आहे, असे एमपीएससीचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे शिक्षणाधिकारी भरती घोटाळ्याचा चेंडू आता शासनाचा कोर्टात आला आहे. एमपीएससीकडून शिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या बहुसंख्य उमेदवारांनी चुकीची व खोट्या माहितीच्या आधारावरील नॉन किमिलेअर प्रमाणपत्र सादर करून शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती मिळवल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.राज्याच्या शिक्षण विभागाच्या उपसचिवांनीही शिक्षण आयुक्तांकडे या संदर्भातील अहवाल मागविला आहे. एक वर्षानंतर का होईना आयुक्त कार्यालयाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, लवकरच याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या माध्यमातून प्रथम दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. शिक्षण अधिकाऱ्यांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याबाबत आता शासनस्तरावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या मंत्रालयीन विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळसेवा भरतीच्या परीक्षांच्या कामासाठी नियुक्त केलेले शासन सेवेतील अधिकारी परीक्षांचे काम करण्यास नकार देत असल्याचे समोर आले होते. तसेच, विहित कालावधीत काम पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ करू नये, असा फतवा राज्य शासनाने काढला आहे.एमपीएससीतर्फे मंत्रालय विभागांतर्गत पदोन्नतीच्या व सरळ सेवा प्रवेशोत्तर विभागीय परीक्षांसाठी शासन सेवेतील अधिकाऱ्यांची परीक्षक, नियामक व तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र, नियुक्त केलेले काही अधिकारी परीक्षेचे कामकाज नाकारत असल्याचे एमपीएससीने शासनाच्या निदर्शनास आणले आहे.