मनोरंजनाचा वाढला गोडवा

By Admin | Updated: May 25, 2015 05:50 IST2015-05-25T05:50:14+5:302015-05-25T05:50:14+5:30

पिंपरी-चिंचवड शहराला मनोरंजनाचे वलय लाभले आहे. शहरातील सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक घडामोडीत वाढ होत चालली आहे.

Recreation grew sweet | मनोरंजनाचा वाढला गोडवा

मनोरंजनाचा वाढला गोडवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला मनोरंजनाचे वलय लाभले आहे. शहरातील सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक घडामोडीत वाढ होत चालली आहे. उदयाने, यात्रा, शहरातील नाट्यगृहे यामुळे हौशी नागरिकांना मात्र मनोरंजनाचा गोडवा मिळत आहे. दैनंदिन व्याख्यानमाला, नाटके, विविध शिबिरे, परिसरातील यात्रांमुळे शहराचा सांस्कृतिक लौकिक वाढत आहे.
महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रा भरवली जाते. बचतगटांच्या माध्यमातून यावेळी जत्रेसारखेच स्वरूप शहराला प्राप्त होत आहे. तसेच चिंचवडगाव मोरया गोसावी येथे दर चतुर्थीला यात्रा भरत आहे. यांमध्ये विविध खेळणी, पाळणे, झोके तसेच घसरगुंडी आदीसाठी बालगोपालांची गर्दी होत आहे. आकुर्डीतील खंडोबा माळ येथे दिवाळी व उन्हाळ्याच्या २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत, सांगवी परिसरातही जत्रेसारखा उत्सव भरलेला दिसून येतो. लहान मुलांसाठी, पाळणे, झोके, सी-सॉ, घसरगुंडी, शिडी, विविध गेम्स भरविल्या जात आहेत. निगडीतही सायंकाळी विविध खेळांचा आनंद नागरिक लुटतात.(प्रतिनिधी)

Web Title: Recreation grew sweet