पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 05:17 PM2021-07-09T17:17:35+5:302021-07-09T17:17:55+5:30

तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत आणि हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे. अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती घालण्यात आली.

‘Raw’ scares young woman in Pune; Looted Rs 10 lakh including laptops and cash | पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

googlenewsNext
ठळक मुद्दे तरुणीला अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून, त्याच्या देखरेखाली दुबई, अमेरिका, हिंदुस्थान असल्याची बतावणी केली. आम्ही १५४ देश हँंडल करतो असेही सांगितले.

पुणे: पुण्यातील एका २८ वर्षीय तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत आणि हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे. अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती घालण्यात आली. तिच्याकडून एकाने ८ लाख ३७ हजारांची रोकड आणि आयफोनसह १० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार एप्रिल ते जून कालावधीत उघडकीस आला आहे. तरूणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अमित चव्हाण ( वय ३०) याला ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी तरूणी फँशन डिझायनर आहे.

अमितने काही दिवसांपुर्वी बेटर हाफ सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर राहुल पाटील असे खोटे नाव सांगून ओळख वाढल्यानंंतर त्याने तरुणीला अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून, त्याच्या देखरेखाली दुबई, अमेरिका, हिंदुस्थान असल्याची बतावणी केली. आम्ही १५४ देश हँंडल करतो. हिंदुस्थानामध्ये आम्ही तपासासाठी आलो आहोत, तुझ्यावर रॉ ची नजर आहे. अशी भीती त्याने तरुणीला दाखवली. त्यानंतर अमितने तरुणीला मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्यास सांगून तिचे सिमकार्ड घेतले.

तरूणीने व्यवसायासाठी आणलेले पैसे घेऊन, मित्राच्या सूरत आणि गुजरातच्या टेक्स्टाईल मिलमधून कमी किंमतीत आणि लवकर मटेरिअल मिळेल असे आमिष दाखवित वेळोवेळी आॅनलाईन पद्धतीने तिच्याकडून रक्कम घेतली. त्यामध्ये ८ लाख ३७ हजारांच्या रोकडसह १ लाख २८ हजारांच्या लॅपटॉपचा समावेश आहे. तरूणीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे करीत आहेत.

Web Title: ‘Raw’ scares young woman in Pune; Looted Rs 10 lakh including laptops and cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.