बलात्कारप्रकरणी नराधमास महिलांचा चोप

By Admin | Updated: May 29, 2014 05:01 IST2014-05-29T05:01:05+5:302014-05-29T05:01:05+5:30

मूक-बधिर तरुणीवर मूकबधिर विवाहित तरुणाने ८ महिन्यांच्या कालावधीत वारंवार अत्याचार केला.

The rape of women in the name of rape | बलात्कारप्रकरणी नराधमास महिलांचा चोप

बलात्कारप्रकरणी नराधमास महिलांचा चोप

पिंपरी : मूक-बधिर तरुणीवर मूकबधिर विवाहित तरुणाने ८ महिन्यांच्या कालावधीत वारंवार अत्याचार केला. तिचा गर्भपातही करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नराधमास बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दामिनी ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी चोप देऊन भोसरी पोलिसांच्या स्वाधिन केले. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी करण्याचे काम सुरू असल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. रवींद्र नारायण नलावडे (वय २८, रा. शांतीनगर, भोसरी) हे चोप दिलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित तरुणी प्राधिकरण, निगडी येथे आयटीआयचे शिक्षण घेत आहे. नलावडेची पत्नी प्राधिकरण, निगडीतील मूकबधिर विद्यालयात शिक्षिका असून, ती तरुणीला शिकवत असे. तिचे व तरुणीच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध आहेत. दोघा पतीपत्नीचे तरुणीच्या घरी येणे जाणे होते. शिकवणीला घेऊन जातो, असे सांगून नलावडे तरुणीस बाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करीत होता. तिला दम देऊन, अश्लील चित्रफिती दाखवून, तसेच गुुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करीत असे. टीव्हीवर गुन्हेविश्वावरील मालिका पाहून तरुणीने झालेला अन्यायाला वाचा फोडण्याचे धाडस केले. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. या संदर्भात मदतीसाठी त्यांनी नगरसेविका सुलभा उबाळे यांची भेट घेतली. मूकबधिर असल्याने ती काय सांगत आहे, हे समजत नव्हते. उबाळे यांनी त्वरित मूकबधिर शाळेतील निवृत्त शिक्षिकेस बोलावून घेतले. त्या शिक्षिकेने तरुणीशी संवाद साधल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यमुनानगर, निगडी येथील दामिनी ब्रिगेडच्या महिला सदस्या संबंधित तरुणीस घेऊन भोसरी येथील नलावडेच्या घरी गेल्या. तो घरी नसल्याने महिला दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या भोसरीतील टाटा मोटर्स मटेरीयल गेटजवळील खासगी कंपनीत गेल्या. त्याला पकडून चोप दिला आणि भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. फिर्यादी व आरोपी दोघे मूकबधिर असल्याने पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तपासाला विलंब होत होता. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात चौकशीचे काम सुरू होते. नराधमाच्या मित्रांच्या मोबाइलवर या दोघांचे छायाचित्रे असल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या संदर्भात भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘चौकशी सुरू आहे. दोघे मूक बधिर असल्याने संभाषणास अवधी लागत आहे. चौकशी पूर्ण होताच गुन्हा दाखल केला जाईल.’’(वार्ताहर)

Web Title: The rape of women in the name of rape