पुण्यातील धक्कादायक घटना; ४२ वर्षांच्या दाजीचा अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:00 IST2022-04-13T13:00:00+5:302022-04-13T14:00:38+5:30

धमकी देत केले अत्याचार....

rape of minor sister in law case after daughter is 5 months pregnant | पुण्यातील धक्कादायक घटना; ४२ वर्षांच्या दाजीचा अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार

पुण्यातील धक्कादायक घटना; ४२ वर्षांच्या दाजीचा अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार

पुणे : बहिणीला नांदविणार नाही, अशी धमकी देऊन दाजीने आपल्याच अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार केला. त्यातून ही १५ वर्षांची मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी गाडीतळ येथे राहणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिच्या ४२ वर्षांच्या दाजीला अटक केली आहे. हा प्रकार गाडीतळ येथील साईनाथ वसाहतीत डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीचा पती आहे. डिसेंबर २०२० मध्ये घरात कोणी नसताना त्याने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या बहिणीला नांदवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.

या घटनेनंतर त्याने वेळोवेळी या मुलीवर बलात्कार केला. या लैंगिक अत्याचारात ती गर्भवती राहिली. ५ महिन्यानंतर आता हा प्रकार उघड झाल्यानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दाजीला अटक केली आहे.

Web Title: rape of minor sister in law case after daughter is 5 months pregnant