Pune: फेसबुकरवची ओळख, लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 11:51 AM2024-01-27T11:51:21+5:302024-01-27T11:52:09+5:30

पुण्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय अभिनेत्रीने याप्रकरणी तक्रार दिली असून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

Rape of 32-year-old actress on the lure of marriage, incident in Pune's Vimannagar area | Pune: फेसबुकरवची ओळख, लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; पुण्यातील घटना

Pune: फेसबुकरवची ओळख, लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; पुण्यातील घटना

- किरण शिंदे

पुणे : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष दाखवून ३२ वर्षीय अभिनेत्रीसोबत वारंवार लैगिंक अत्याचार करण्यात आला. पुणे शहरातील विमानतळ आणि मुळशीतील एका रिसॉर्टवर ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. विराज रविकांत पाटील (वय ३५, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय अभिनेत्रीने याप्रकरणी तक्रार दिली असून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अभिनेत्री असून पतीपासून विभक्त राहते. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ती राहण्यासाठी आहे. तिची आणि आरोपीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीचेही लग्न झाले आहे. मात्र पत्नीपासून घटस्फोट घेणार असून तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष त्याने फिर्यदीला दाखवले. तिच्यासोबत नैसर्गिक आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही काळाने आरोपीने फिर्यादीचा फोन घेण्याचे टाळले. त्यावर फिर्यादीने मला का टाळतोस, घरच्यांना का भेटवत नाहीस असे विचारले. 

त्यावर आरोपीने फिर्यदिला शिवीगाळ करत डोक्यावर पिस्तल ठेवली अन् "मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, पोलिसांकडे गेलीस तर तुला दाखवतो, मी कोण आहे ते" असे म्हणत धक्काबुक्की केली. या सर्व घटनेनंतर फिर्यादी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Rape of 32-year-old actress on the lure of marriage, incident in Pune's Vimannagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.