SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'

South Africa vs Bangladesh Live Match Updates : आज दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:36 PM2024-06-10T21:36:39+5:302024-06-10T21:40:02+5:30

whatsapp join usJoin us
t20 world cup 2024 RSA vs BAN Live Match Updates South Africa set Bangladesh a target of 114 runs to win  | SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'

SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RSA vs BAN Live Match Updates । न्यूयॉर्क : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या २१ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आमनेसामने आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होत आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीपासून न्यूयॉर्कच्या या मैदानातील खेळपट्टीने गोलंदाजांना साथ दिली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी याचाच फायदा घेत ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेची 'कसोटी' केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या संघाला खूप संघर्ष करावा लागला. फसून येणाऱ्या चेंडूने सेट फलंदाजांना शांत ठेवले. डेव्हिड मिलरसारखा स्फोटक फलंदाज देखील संथ गतीने धावा करताना दिसला.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेन वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याच्याशिवाय डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत २९ धावांची सावध खेळी केली. आफ्रिकन फलंदाजांना शांत ठेवण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी यश मिळवले. अखेर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित २० षटकांत ६ बाद ११३ धावा करून बांगलादेशला विजयासाठी ११४ धावांचे आव्हान दिले. बांगलादेशकडून तन्जीम हसन शाकिबने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर तस्कीन अहमद (२) आणि रिशद हुसैनला (१) बळी घेण्यात यश आले. 

बांगलादेशचा संघ -
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, लिटन दास, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, झाकीर अली, महमुदुल्लाह, रिशद हुसैन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ -
एडन मार्करम (कर्णधार), रिझा हेंड्रिक्स, क्विंटन डीकॉक, ट्रिस्टियन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, ओटनेल बार्टमॅन. 

Web Title: t20 world cup 2024 RSA vs BAN Live Match Updates South Africa set Bangladesh a target of 114 runs to win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.