दावडी : घरात कोणी नसल्याची पाळत ठेवून राजगुरुनगर येथील संतोष महादू पाचारणे यांच्या घराचे कुलूप बनावट किल्लीने उघडून घरातील कपाटात ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने व ३ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल (दि. १४) घडली. याबाबत खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील तिन्हेवाडी रस्त्यावर असलेल्या संतोष महादू पाचारणे यांच्या घरातील मंडळी कामानिमित्ताने १३ मेपासून परगावी गेली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराला असलेले कुलूप बनावट किल्लीनी उघडून घरात प्रवेश केला. कपाटातून पाच तोळ्यांची दोन सोन्याची गंठणे, तीन तोळ्यांचा लक्ष्मीहार व २ तोळ्यांचा नेकलेस, असे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ३ लाख ८५ रुपये रोख रक्कम चोरट्यांची चोरून नेली. चोरीची घटना आज सकाळी उघड झाली आहे. (वार्ताहर)
राजगुरुनगरला घरफोडी; १५ तोळे लंपास
By admin | Updated: May 16, 2015 04:07 IST
घरात कोणी नसल्याची पाळत ठेवून राजगुरुनगर येथील संतोष महादू पाचारणे यांच्या घराचे कुलूप बनावट किल्लीने उघडून घरातील कपाटात ठेवलेले
राजगुरुनगरला घरफोडी; १५ तोळे लंपास
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}