धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात

By Admin | Updated: June 21, 2016 00:32 IST2016-06-21T00:32:08+5:302016-06-21T00:32:08+5:30

महाराष्ट्रभर वेगाने आगेकूच सुरू असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारी (दि.१९) मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

Rain starts in the dam waters | धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात

महाराष्ट्रभर वेगाने आगेकूच सुरू असलेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारी (दि.१९) मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या धरणांमध्ये वसाचा जोर कमी असला तरी संततधार सुरू
असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात फरक पडणार नसला, तरी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे वेधशाळेकडून कळविण्यात आले आहे.
त्यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक २४ मिलिमीटर पावसाची नोंद येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली असून, भामा आसखेड, वीर तसेच नाझरे धरणाचे पाणलोट क्षेत्र अद्याप कोरडेच आहे.

Web Title: Rain starts in the dam waters