स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:10 IST2026-03-09T12:10:31+5:302026-03-09T12:10:51+5:30

एन.आय.बी.एम. रोडवरील एका इमारतीत मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती

Raid on spa center; 4 women rescued from prostitution, Thai spa manager arrested | स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक

स्पा सेंटरवर छापा; वेश्याव्यवसायातून ४ महिलांची सुटका, थायलंडच्या स्पा मॅनेजर महिलेला अटक

पुणे : कोंढवा परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकून चार महिलांची सुटका केली. या प्रकरणी स्पा सेंटरच्या महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून एका पुरुष आरोपीचा शोध सुरू आहे. टी झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय ३२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, मूळ रा. थायलंड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन.आय.बी.एम. रोडवरील सनश्री वूड्स, कमर्शियल प्रिमायसेस इमारतीतील ‘ओपल स्पा अँड सलून’ येथे मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली.

त्यानंतर पोलिसांनी ७ मार्च रोजी अचानक छापा टाकला. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच स्पा सेंटरची व्यवस्थापक खितान हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका पुरुष आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Web Title : पुणे स्पा छापा: वेश्यावृत्ति भंडाफोड़, थाई प्रबंधक गिरफ्तार, महिलाएं मुक्त

Web Summary : पुणे पुलिस ने कोंढवा में एक स्पा पर छापा मारा, वेश्यावृत्ति के लिए मजबूर चार महिलाओं को बचाया। थाई स्पा प्रबंधक को गिरफ्तार किया गया, और एक अन्य पुरुष संदिग्ध की तलाश जारी है। पुलिस को सूचना मिलने और एक नकली ग्राहक भेजने के बाद छापा मारा गया। अनैतिक तस्करी निवारण अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है।

Web Title : Pune Spa Raid: Women Rescued, Thai Manager Arrested in Prostitution Bust

Web Summary : Pune police raided a Kondhwa spa, rescuing four women forced into prostitution. The Thai spa manager was arrested, and a search for another male suspect is underway. The raid occurred after police received a tip and sent in a decoy customer. A case has been registered under the Prevention of Immoral Trafficking Act.