शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रब्बी हंगाम जाणार खडतर; नऊ वर्षांतील दुसरे दुष्काळी वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 02:07 IST

राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे.

पुणे : राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगलाच खडतर जाणार आहे. जलसंपदा विभागातर्फे इंदापूर, दौंड, बारामतीला शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून कालव्यातून सुमारे ८५ कि.मी.पर्यंत पाणी पोहोचले आहे.जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती असून राज्य शासनानेही १० तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे जाहीर केले आहे. यंदा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात आॅगस्ट महिन्यापर्यंत संततधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली. परिणामी खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने उजनी धरण १०० टक्के भरले. परंतु, जिल्ह्यातील काही तालुक्यात ४० ते ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.त्यामुळे जिल्ह्यातील भात पिकांसह,बाजरी, ज्वारी, सोयाबीन आदी पिके जळून गेली आहेत. त्यातच दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे तब्बल एक महिना कालव्यातून सोडण्यात आलेला विसर्ग बंद करावा लागला.दोन दिवसांपूर्वीच (रविवारी ) रब्बी हंगामासाठी विसर्ग सोडण्यात आला आहे. कालवा समितीच्या बैठकीत शेतीसाठी व पिण्यासाठी किती पाणी राखून ठेवावे.तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी केव्हा पाणी सोडले जावे याबाबतचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार यंदा १५ आॅक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाणार होते. परंतु, सुमारे १५ दिवस कालव्यातून शेतीसाठी विसर्ग सोडण्यास उशीर झाला. त्यातच सध्या खडकवासला धरण प्रकल्पात २०१५ नंतर सर्वात कमी पाणीसाठा आहे. २०१५ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी खडकवासला प्रकल्पात १५ आॅक्टोबर रोजी केवळ १६.१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा १५ आॅक्टोबर रोजी प्रकल्पात २५.३८ टीएमसी एवढा साठा शिल्लक होता.२०१०पासून २०१८ पर्यंतचा खडकवासला प्रकल्पातील हा सर्वात कमी साठा आहे. २०१० ते २०१४ पर्यंत १५ आॅक्टोबर रोजी २६ ते २८ टीएमसी पर्यंत धरणसाठा उपलब्ध होता.मागील वर्षी रब्बीसाठी 35 दिवस पाणीगेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खडकवासला धरण प्रकल्पातून रब्बी तब्बल 35 दिवस पाणी सोडण्यात आले होते.तरीही धरणात मुबलक पाणी शिल्ल्क होते.जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागील वर्षी 24 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने २४ मार्च २०१८ ते १७ जून २०१८ पर्यंत कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता. एकाही दिवसाचा खंड न ठेवता सुमारे तीन महिने कालव्यातून विसर्ग सोडण्यात आला होता.परंतु,यंदा पाऊस कमी झाल्याने शेती व पिण्यासाठी काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. खडकवासल्यापासून सोडलेले पाणी २०२ कि.मी. चा प्रवास करून इंदापूरपर्यंत पोहचते. त्यामुळे पाणी पोहचण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई