शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:06 IST

Prashant Kishor, Bihar Election Results: बिहार निवडणुकीत काँग्रेस, आरजेडीपेक्षाही जनसुराज पक्षाला मोठा धक्का बसला

Prashant Kishor, Bihar Election Results: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयूने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, काँग्रेस, आरजेडी आणि जनसुराज पक्षाला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना त्यांच्या पक्षाचे खातेही उघडता आले नाही. निवडणूक निकालानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार होते. पण, शेवटच्या क्षणी त्यांना पत्रकार परिषद रद्द केली. त्यामुळे, प्रशांत किशोर यांच्याकडे उत्तर देण्यासारखे काहीही शिल्लक नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

आधी घोषणा, मग रद्द

जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आज १६ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. ही पत्रकार परिषद विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि जनसुराजच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी नियोजित होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. जनसुराजने ही निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, तरीही त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

अजूनही प्रशांत किशोर यांच्यावर लक्ष

निवडणूक रणनितीकार म्हणून लौकिक असल्याने, निवडणूक निकालानंतर सर्वांच्या नजरा प्रशांत किशोर यांच्या पत्रकार परिषदेवर आहेत. प्रशांत त्यांच्या राजकारणाबाबत आणि त्यांच्या विधानांबाबत पुढील पावले काय उचलतात हे पाहणे बाकी आहे. पीके यांनी त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलली असली तरी, लोक अजूनही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

उमेदवारांना डिपॉझिट वाचवणंही झालं अशक्य

प्रशांत किशोर गेल्या तीन वर्षांपासून बिहार निवडणुकीसाठी कठोर परिश्रम करत आहेत. त्यांनी राज्यातील २४३ पैकी २३९ जागांवर निवडणूक लढवली. त्यांच्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या मध्यातच पक्ष बदलला. जवळजवळ प्रत्येक जागेवर प्रचार करूनही प्रशांत किशोर यांना एकही जागा जिंकता आली नाही. बहुतेक उमेदवारांचे तर डिपॉझिटही जप्त झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: Prashant Kishor cancels press conference after election setback.

Web Summary : Prashant Kishor's press conference, planned after his party's poor Bihar election performance, was abruptly canceled. His party failed to win any seats and many candidates lost their deposits, raising questions about his future political strategy.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024Mediaमाध्यमे