शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्डची परिणामकारकता व अचुकतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

\Sलोकमत न्युज नेटवर्क पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड या लसीची परिणामकारकता व अचुकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

\Sलोकमत न्युज नेटवर्क

पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड या लसीची परिणामकारकता व अचुकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. काही स्वयंसेवकांना दिलेला अर्धा डोस, ही चुक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दोन पध्दतींमधील स्वयंसेवकांची संख्या, वयोगट याबाबतही कंपनीकडून स्पष्टीकरण न दिल्याने साशंकता व्यक्त होत आहे. सिरम संस्थेमध्ये याच लसीचे उत्पादन होत असल्याने जगभरातील शंभर राजदुतांचा दौरा अचानक रद्द केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिरम संस्थेकडून आतापर्यंत कोविशिल्डचे चार कोटी डोस तयार केले आहेत. कंपनीकडून आर्थिक जोखीम पत्करून हे उत्पादन केले जात असल्याने भारतासह जगभराचे लक्ष या लसीच्या परिणामकारकतेकडे लागले आहे. जगाला गरज असलेल्या कोरोनाच्या लसींच्या जवळपास निम्मे उत्पादन करण्याची सिरमची क्षमता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ‘सिरम’ला अनन्य साधारण महत्व आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील १०० देशातील राजदुत सिरम संस्थेला भेट देणार होते. पण राजदुतांचा दौरा अचानक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. लसीच्या विश्वासार्हतेवर जगभरातील काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. त्यामागची कारणेही तशीच आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका स्वयंसेवकावर लसीचा विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काही दिवस लसीच्या चाचण्याही थांबविल्या होत्या. तसेच अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘लसीची परिणामकारक जवळपास ७० टक्के आहे. पहिला डोस अर्धा आणि महिनाभराने एक पूर्ण डोस दिल्यास ही परिणामकारकात ९० टक्क्यांपर्यंत जाते. तर दोन्ही डोस पुर्ण दिल्यानंतर हे प्रमाण ६२ टक्के एवढे आहे.’ कंपनीच्या या दाव्यावरच तज्ज्ञांकडून साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे कंपनीकडूनही आता लस किती प्रभावी आहे, हे पाहण्यासाठी अतिरिक्त चाचण्या घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

----

तज्ज्ञांचे म्हणणे...

- स्वयंसेवकांच्या एका गटाला अर्धा डोस व नंतर एक डोस तर दुसऱ्या गटाला दोन पुर्ण डोस दिले. प्रत्यक्षात कोणत्या पध्दतीनुसार लसीकरण होणार?

- दोन्ही गटातील स्वंयसेवकांचे प्रमाण व वयोगट वेगळा असल्याने परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह

- लस दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग स्वयंंसेवकांना झाला की नाही, याचे स्पषटीकरण नाही

- गोंधळून टाकणाऱ्या आकडेवारीमुळे संभ्रम

- लसीच्या दुष्परिणामांबाबत कंपनीकडून मौन

----

सिरममधील राजदुतांच्या दौऱ्यामध्ये जगभराची लसीची गरज, सध्याचे उत्पादन, क्षमता, वितरण आदी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता होती. हा दौरा म्हणजे लसीच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होते. पण लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याने दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. अ‍ॅस्ट्रॉझेनेकाकडून लसीबाबतच्या सर्व शंका दुर केल्यानंतरच हा दौरा पुन्हा ठरू शकतो, अशी शक्यता आहे.