शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पुरंदर विमानतळासाठी चार महिन्यांत भूसंपादन सुरु करणार : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 8:28 PM

पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपुरंदरमध्ये विमानतळ सिटीदेखील उभारणारआंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून विमानतळ शहर असणारपुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी येत्या चार महिन्यांत जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. तसेच विमानतळ परिसरात नगर रचना विभागाच्या नियमाप्रमाणे एक उत्तम शहर (सिटी) उभारणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात कार्यक्रमप्रसंगी दिले.पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादन कसे करायचे याचे नियोजन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे करत आहेत. त्याचबरोबर या विमानतळाच्या परिसरात विमानतळ शहर (सिटी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नगर रचनेच्या नियमांनुसार (टीपी स्कीम) प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे.  केवळ सिमेंट कॉँक्रिटचे जंगल उभे न करता त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले असे हे विमानतळ शहर असणार आहे. या विमानतळ सिटीमध्ये सुनियोजित पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, शाळा, बगीचे, दवाखाने, विद्यूतीकरण, इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले. विमानतळासाठी नियोजन सुरू आहे. जेणेकरून या ठिकाणी अधिकाधिक गुंतवणूक वाढेल. यासाठी तीन-चार सरकारी कंपन्या एकत्रित काम करत असून, हा विषय अंतिम टप्प्यात असल्याचे फडणवीस याप्रसंगी म्हणाले. ....................खडकवासला ते फुरसुंगी टनेल बांधापुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मुळशी धरणातील पाणी भीमा पात्रात सोडून ते पाणी पूर्व भागातील तालुक्यांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा. तसेच पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी असा किलोमीटर टनेल बांधावा. त्यामुळे जवळपास ३ टीएमसी पाणी बचत यामधून होईल, अशा प्रमुख मागण्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.................पीएमआरडीएची स्थापना होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रिंगरोड, मेट्रो आणि टाऊन प्लनिंगच्या १४ योजना प्रामुख्याने करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू असून, लवकरच पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. पीएमआरडीएच्या वतीने शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे प्रकल्प राबविण्यात येत आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापटFarmerशेतकरी