शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

पुण्याचा विद्यासागर जगात चमकला ; ग्रहाचे केले बारसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 1:36 PM

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील विद्यासागर दौड या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्याने सुचवलेल्या नावावर  स्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने पसंतीची मोहोर उमटवली असून आता हे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे.

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील विद्यासागर दौड या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्याने सुचवलेल्या नावावर  स्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने पसंतीची मोहोर उमटवली असून आता हे नाव एका ग्रहाला देण्यात येणार आहे. १३ वर्षांच्या विद्यासागरने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यासागर हा पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाच्या (आयएयू) शताब्दी वर्षांनिमित्त ग्रह-ताऱ्यांना नाव देण्याची स्पर्धा जागतिक पातळीवर घेण्यात आली. त्याच स्पर्धेतला एक भाग म्हणून ग्रह-ताऱ्यांना भारतीय भाषांतील नाव सुचवण्यासाठी ‘नेम एक्झोवर्ल्ड्स इंडिया’ स्पर्धा जुलैमध्ये जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, विज्ञानाची गोडी लागावी हा या स्पर्धेचा हेतू होता. या स्पर्धेत संपूर्ण देशातून  १ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ समितीकडून परीक्षण करून अंतिम फेरीसाठी  १० नावे निवडण्यात आली. अंतिम फेरीत विजेता निवडण्यासाठी खुले मतदान घेण्यात आले. जवळपास ५ हजार ५८७ नागरिकांनी केलेल्या मतदानानंतर दोन नावे निश्चित करण्यात आली.त्यात विद्यासागरने सुचवलेले 'संतमस' आणि अनन्यो भट्टाचार्यने 'बिभा' ही दोन नावे निवडण्यात आली आहेत. यापैकी एचडी८६०८१ या ताऱ्याला ‘बिभा’ आणि एचडी८६०८१ या ग्रहाला ‘संतमस’ ही नावे देण्यात आली आहेत. 

याबाबत  अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ जी. सी. अनुपमा यांनी माहिती दिली की, अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्यामाध्यमातून भारतीय भाषांमध्ये सुचवण्यात आली.ही नावे आंतरराष्ट्रीय खगोल महासंघांने स्वीकारली आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांचा आणि अंतिम फेरीतील स्पर्धकांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणsinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युट