शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी ठरविण्याची पुणेकरांना संधी

By admin | Updated: July 13, 2015 03:55 IST

स्मार्ट पुणे कसं असावं... त्यामध्ये वाहतूक, पाणी, किफायतशीर घरे, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यापैकी कोणत्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर भर द्यावा...

पुणे : स्मार्ट पुणे कसं असावं... त्यामध्ये वाहतूक, पाणी, किफायतशीर घरे, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यापैकी कोणत्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर भर द्यावा... शहर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी आणखी काय करता येईल, हे ठरविण्याची संधी पुणेकरांना लवकरच मिळणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या निकषानुसार शहराच्या विकासामध्ये नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पुणेकरांचा कौल लवकरच जाणून घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी व बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशभरातील १०० शहरांचा समावेश केला जाणार आहे. पहिल्यांदा राज्यपातळीवर आणि त्यानंतर देशपातळीवर स्पर्धात्मक पद्धतीने या १०० शहरांची निवड केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. स्पर्धेचे बहुतांश निकष पुणे शहराकडून पूर्ण होत असल्याने पहिल्या टप्प्यातच पुण्याचा समावेश होण्याची मोठी शक्यता आहे.पुण्याचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा, याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांना राज्य शासनापुढे सादरीकरण करायचे आहे. त्यापूर्वी पुणेकरांना स्मार्ट सिटीबाबत काय वाटते, त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा, याबाबत पुणेकरांची मते जाणून घेतली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप, व्टिटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचा कौल आजमाविण्याचा विचार प्रशासनाकडन करण्यात येत आहे.शहरातील प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये पुणेकरांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे. पर्यावरण, वाहतूक, नदीसुधार अशा अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबतचे धोरण ठरविण्यात प्रशासनाला मदत केली आहे. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पुण्याची ही महत्त्वाची जमेची बाजू असणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून विकेंद्रित पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रियावर करण्यात पुणे आघाडीवर आहे. झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक शौचालय पुणे महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहेत.