Pune ZP Election Result 2026: पुण्यातील खेड तालुक्यात मशाल पेटली; ठाकरे सेनेची एक हाती सत्ता, तर भाजपला भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:45 IST2026-02-09T15:45:19+5:302026-02-09T15:45:29+5:30
Pune ZP Election Result 2026 खेड तालुक्यात शिवसेनेने पंचायत समितीत खाते उघडले असून त्यांचा एक सदस्य विजयी झाला आहे

Pune ZP Election Result 2026: पुण्यातील खेड तालुक्यात मशाल पेटली; ठाकरे सेनेची एक हाती सत्ता, तर भाजपला भोपळा
राजगुरुनगर: खेड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला असून पंचायत समितीवर एक हाती सत्ता आली आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे १६ पैकी ९ सदस्य विजयी झालेली आहेत. तर जिल्हा परिषदेचे ८ पैकी ५ सदस्य विजयी झालेले आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पंचायत समितीत ६ जागा मिळाल्या तर जिल्हा परिषदेत ३ उमेदवार विजयी झाले. शिंदे शिवसेनेने पंचायत समितीत खाते उघडले असून त्यांचा एक सदस्य विजयी झाला आहे.
खेड जिल्हा परिषद विजयी उमेदवार
उबाठा शिवसेना - ०५
राष्ट्रवादी - ३
शिंदे शिवसेना - ००
1 वाडा - समीर सुपे ( राष्ट्रवादी )
२ कडूस - तनुजा घनवट ( उबाठा )
३ रेटवडी - दिप्ती भोगाडे ( उबाठा )
४ पिंपळगाव - विजयसिंह शिंदे ( उबाठा )
५ मेदनकवाडी - गणेश अरगडे ( उबाठा )
६ पाईट - सुनीता बुट्टे ( राष्ट्रवादी)
७ नाणेकरवाडी - गणेश बोत्रे ( राष्ट्रवादी)
८ कुरुळी - विनया मुंगसे ( उबाठा)
खेड पंचायत समिती
उबाठा शिवसेना - ०९
राष्ट्रवादी - ०६
शिंदे शिवसेना - ०१
१ )नाणेकरवाडी - रुपाली कांबळे.
२ ) महाळुंगे -अश्विनी तरस.
३ ) आळंदी ग्रामीण- निखिल थोरवे.
४ )मेदनकरवाडी- महेंद्र मेदनकर.
५ )कुरुळी- गौरी चंदन मृऱ्हे
६ ) काळुस- मंगेश सावंत.
७ )पिंपळगाव -विद्याताई मोहिते.
८ )मरकळ - प्रसाद घेनंद.
९ )रेटवडी - दिलीप डुबे
१० )वाफगाव माऊली ढेरंगे.
११ )वाडा - मनिषा हिले
१२ )वाशेरे दिनेश हांडे.
१३ )पाईट -सारिका गोगावले.
१४ )आंबेठाण - श्रद्धाताई मांडेकर
१५ )कडूस- शंकर कावडे.
१६ ) चास- कविता राक्षे.