Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; किती जागांवर होते निर्विवाद वर्चस्व?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:13 IST2026-02-09T11:12:18+5:302026-02-09T11:13:20+5:30
Pune ZP Election Result 2026 भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; किती जागांवर होते निर्विवाद वर्चस्व?
पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) ६८.३५ टक्के मतदान झाले. तर, सोमवारी (दि. ९) मतमोजणी होणार असून, जिल्ह्याचे राजकीय कारभारी कोण असतील, याचा फैसला होणार आहे. सकाळी दहापासून १३ ठिकाणी मतमोजणी असू झाली असून दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी पुण्यात राष्ट्रवादीची १० आणि भाजपची ६ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ३ जागांवर आघाडीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने प्रत्येकी एक खाते उघडले आहे.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यात ७५ गटांपैकी ४४ गटांत विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. त्याखालोखाल शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला होता. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते. मात्र, यंदाची राजकीय परिस्थिती बदललेली असल्याने निकालाची गणिते वेगळी ठरण्याची शक्यता आहे. मतमोजणी करताना गट व गण यांची एकत्रितच मोजणी केली जाणार आहे, त्यामुळे निकाल देताना गट व गणाचा एकाच वेळी मिळणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी (अंदाजे)
जुन्नर – ६१.१८
आंबेगाव – ६५.३०
शिरूर – ७५.५९
खेड – ७५.४६
मावळ – ७७.४३
मुळशी – ६३.७९
हवेली – ६८.०२
दौंड – ६५.००
पुरंदर – ६८.३७
राजगड (वेल्हा) – ७९.३०
भोर – ७५.६२
बारामती – ५४.९०
इंदापूर – ६५.६७