Pune ZP Election Result 2026: मुळशीत राष्ट्रवादीचा पॅटर्न; तालुक्यात घड्याळ, इतिहासात प्रथमच भाजपने १ जागा मिळवून उघडले खाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:37 IST2026-02-09T15:36:23+5:302026-02-09T15:37:06+5:30

Pune ZP Election Result 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन तर पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागेवरती विजय मिळवला आहे

Pune ZP Election Result 2026 NCP's pattern in Mulshi; Clock in the taluka, for the first time in history, BJP opened its account by winning 1 seat | Pune ZP Election Result 2026: मुळशीत राष्ट्रवादीचा पॅटर्न; तालुक्यात घड्याळ, इतिहासात प्रथमच भाजपने १ जागा मिळवून उघडले खाते

Pune ZP Election Result 2026: मुळशीत राष्ट्रवादीचा पॅटर्न; तालुक्यात घड्याळ, इतिहासात प्रथमच भाजपने १ जागा मिळवून उघडले खाते

पिरंगुट : मुळशी तालुक्यात तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन तर पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागेवरती विजय मिळवून आघाडी घेतली आहे.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या भुगाव-पिरंगुट गटा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शांताराम इंगवले विजयी झाले. तर पौड-अंबडवेट गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच मिलिंद वाळंज हे विजयी झाले असून मान-हिंजवडी गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव बुचडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भाजपा ने प्रथमच त्यांच्या रूपाने मुळशी तालुक्यामध्ये आपले खाते उघडले आहे.

मुळशी पंचायत समितीच्या सर्वच गणा मध्ये खुपच चुरस पाहायला मिळाली. यामध्ये भुगाव गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे उमेदवार दगदूकाका करंजावणे विजयी झाले आहेत. तर पिरंगुट गणामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचेच राहुल पवळे हे उमेदवार विजयी झाले असून पौड गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काजल मोरे विजयी झाल्या आहेत. तर अंबडवेट गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवार प्रवीण धनवे हे विजयी झाले आहेत. मान गणामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवार मंदा बाबाजी शेळके ह्या विजयी झाल्या आहेत. तर हिंजवडी गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ऐश्वर्या वाघमारे ह्या विजयी झाल्या आहेत.

कासारआंबोली (ता.मुळशी) येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी सकाळी दहा वाजता मत मोजणीला सुरुवात झाली होती. यावेळी सुरुक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. त्यावेळी निकाल ऐकण्यासाठी या सैनिकी शाळेच्या समोर शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती देखील लावली होती. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून सर्व मतमोजणी ही सुरुळीत पणे पार पडली. यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी (भू संपादन क्र 22) विठ्ठल उदमले यांनी तर मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी काम पाहिले. 

Web Title : NCP का मुलशी ZP चुनाव में दबदबा; भाजपा ने पहली बार खोला खाता

Web Summary : NCP ने मुलशी ZP चुनाव में तीन में से दो सीटें जीतीं। भाजपा ने पहली बार एक सीट जीतकर खाता खोला। NCP ने छह पंचायत समिति सीटों में से तीन पर भी कब्जा किया, जो एक मजबूत प्रदर्शन को दर्शाता है।

Web Title : NCP Dominates Mulshi ZP Election; BJP Opens Account for First Time

Web Summary : NCP won Mulshi ZP election with two out of three seats. BJP opened its account by winning one seat for the first time. NCP also secured three of six Panchayat Samiti seats, showcasing a strong performance.