Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी ठरली 'धुरंधर'; तब्बल २६ जागांवर आघाडी, भाजप ६, शिवसेना ३, उद्धवसेना २
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:32 IST2026-02-09T13:32:41+5:302026-02-09T13:32:59+5:30
Pune ZP Election Result 2026 पुण्यात राष्ट्रवादी पक्ष धुरंधर ठरला असून सर्वाधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसू लागले आहे

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी ठरली 'धुरंधर'; तब्बल २६ जागांवर आघाडी, भाजप ६, शिवसेना ३, उद्धवसेना २
पुणे : पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसू लागले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात राष्ट्रवादी पक्ष धुरंधर ठरला असून तब्बल २६ जागांवर आघाडी घेतली आहे. यावरून पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी सर्वाधिक जागा मिळवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्याच्या अपडेटनुसार भाजप ६ जागांवर शिवसेना ३ आणि उद्धवसेना २ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने अजूनही खाते उघडले नाहीये.
या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी मतदानात सुमारे दीड टक्का घट झाली. गेल्या वेळी ७०.३५ टक्के मतदान झाले होते. शनिवारी झालेल्या मतदानानंतर या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, मतमोजणी सुरु आहे. सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतमोजणीला सकाळी दहापासून सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्ह्यात १३ ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यक ती सर्व तयारीची पूर्तता करण्यात आली आहे. वेल्हे येथे सर्वांत कमी तर जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ४० टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल समोर येणार आहे.
आतापर्यंतचे पक्षीय बलाबल
भाजप - 6
शिवसेना -3
उद्धवसेना - 2
राष्ट्रवादी (अजित पवार) - 26
काँग्रेस - 0
राष्ट्रवादी (शरद पवार) - 1
जनसुराज्य - 0
रयत क्रांती - 0