Pune ZP Election Result 2026 : दादा...! अख्खा मावळ तुमचा...! पाचही जिल्हा परिषद, दहाही पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीनेच जिंकल्या; भाजपकडून खेचून आणल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:01 IST2026-02-09T14:00:40+5:302026-02-09T14:01:23+5:30

दादा…! अख्खा मावळ तुमचा…! मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा; पाचही जिल्हा परिषद व दहाही पंचायत समिती जागांवर वर्चस्व

Pune ZP Election Result 2026 All five Zilla Parishad and ten Panchayat Samiti seats were won by the NCP; they were snatched from the BJP | Pune ZP Election Result 2026 : दादा...! अख्खा मावळ तुमचा...! पाचही जिल्हा परिषद, दहाही पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीनेच जिंकल्या; भाजपकडून खेचून आणल्या

Pune ZP Election Result 2026 : दादा...! अख्खा मावळ तुमचा...! पाचही जिल्हा परिषद, दहाही पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीनेच जिंकल्या; भाजपकडून खेचून आणल्या

पिंपरी - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 च्या मतमोजणीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे. मावळमधील पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समितीच्या जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. अनेक जागा थेट भाजपकडून खेचून आणत राष्ट्रवादीने ‘अख्खा मावळ आपलाच’ असा संदेश दिला आहे.

यंदा तब्बल ६८.३५ टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी आघाडीवर असून अंतिम निकालांनीही हे स्पष्ट झाले आहे. मावळ पंचायत समितीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून स्थानिक राजकारणात पक्षाची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र आहे.

पंचायत समितीनिहाय निकाल (मावळ तालुका)

टाकवे बुद्रुक – प्राची गायकवाड यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
नाणे – आशा मोरमारे यांचा स्पष्ट विजय.
वराळे – राजेंद्र कडलक यांनी बाजी मारली.
इंदुरी – दिलीप ढोरे विजयी.
खडकाळे – समीर जाधव यांनी विजय मिळवला.
कार्ला – रेश्मा देवकर यांचा अटीतटीचा पण निर्णायक विजय.
कुसगाव बुद्रुक – योगेश लोहर विजयी.
काले – शैला कालेकर यांनी आघाडी राखली.
सोमाटणे – साहेबराव कारके विजयी.
चांदखेड – सुनिता येवले यांनी विजय मिळवला.

--------
 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 (मावळ तालुका)

मतमोजणी अंतिम निकाल (पंचायत समिती)


टाकवे बुद्रुक पं.स.

अश्विनी कोंडे - 3757
प्राची गायकवाड - 11681
प्राजक्ता शिंदे - 162
नोटा - 171

नाणे पं.स.

संगिता आढारी - 3500
आशा मोरमारे - 10057
चैताली मोरमारे - 208
नोटा - 302

वराळे पं.स.

राजेंद्र कडलक - 9656
रवि शेटे - 6420
नोटा - 181

इंदुरी पं.स.

दिलीप ढोरे - 7073
श्रीकृष्ण भेगडे - 5775
अजय केदारी - 52
नोटा - 100

खडकाळे पं.स.

प्रकाश गायकवाड - 5524
समीर जाधव - 9059
संदीप कदम - 513
नोटा - 326

कार्ला पं.स.

रंजना गाकवाड - 6679
रेश्मा देवकर - 7234
अश्विनी भेगडे - 295
नोटा - 199

कुसगांव बुद्रुक पं.स.

अविनाश जांभुळकर - 925
योगेश लोहर - 7287
नवनाथ हरपुडे - 3217
नोटा - 180

काले पं.स.

शैला कालेकर - 10264
सिमा ठाकर - 8110
नोटा - 405

सोमाटणे पं.स.

साहेबराव कारके - 9218
बाळासाहेब पारखी - 6790
संभाजी लेंडघर - 156
नोटा - 183

चांदखेड पं.स.

सुवर्णा घोटकुले - 7829
सुनिता येवले - 10569
नोटा - 211

Web Title : पुणे ZP, पंचायत समिति चुनाव में NCP का मावल में दबदबा

Web Summary : मावल में, NCP (अजित पवार गुट) ने 2026 जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में सभी सीटें जीतकर दबदबा बनाया। उन्होंने भाजपा उम्मीदवारों को हराया, जो उच्च मतदान के साथ स्थानीय राजनीति में एक मजबूत पकड़ का संकेत है।

Web Title : NCP Dominates Maval in Pune ZP, Panchayat Samiti Elections

Web Summary : In Maval, NCP (Ajit Pawar faction) swept the 2026 Zilla Parishad and Panchayat Samiti elections, securing all seats. They defeated BJP candidates, signaling a strong hold in local politics with a high voter turnout.