पुणेकरांनो लक्ष द्या..! गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:23 IST2026-01-27T19:21:40+5:302026-01-27T19:23:40+5:30
या कामासाठी विद्युत पुरवठा आणि पंपिंग यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावी लागणार असल्याने कालील भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणेकरांनो लक्ष द्या..! गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद
पुणे : महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या व पंपिंग केंद्रांमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग विषयक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (२९ जानेवारी) शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पर्वती नवीन व जुने जलशुद्धीकरण केंद्र, त्याअंतर्गत येणाऱ्या पर्वती एमएलआर, एचएलआर व एलएलआर टाक्या, पर्वती टँक पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर, चिंचवली, वारजे जलकेंद्र तसेच वडगाव जलकेंद्राशी संबंधित विविध टाक्या व पंपिंग व्यवस्थेची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी विद्युत पुरवठा आणि पंपिंग यंत्रणा तात्पुरती बंद ठेवावी लागणार असल्याने कालील भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद राहणार परिसर
पर्वती एमएलआर टाकी : गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, कात्रज गेट, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवारी पेठ, अर्जुन बेडे स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन.
पर्वती एचएलआर टाकी : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, लोअर व अपर इंदिरानगर, शिवदर्शन, बिबवेवाडी गावठाण, औंधकरनगर, गंगाधाम, शेलार मळा, टिळक वसाहत, पर्वती गावठाण, मितानगर, कुमार पृथ्वी, कोंढवा खुर्दचे काही भाग
पर्वती एलएलआर टाकी : सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर व स्वारगेट.
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव खुर्द-बुद्रूक, येवलेवाडी, सहकारनगरचा काही भाग, दाते वसाहत.
राजीव गांधी पंपिंग स्टेशन : संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रूक-खुर्द, बाणेर सिटी, मोझा, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर, शेलार मळा, कात्रज गावठाण, धनकवडी, जुना प्रभात ३५ व ४५ विभाग तसेच येवलेवाडी.
खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, इऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, धनेकर नगर, यशवंतनगर, चंदननगर, गणेशनगर, आनंदपार्क, महादेवनगर, माळवाडी आदी भागांवरही या बंदचा परिणाम होणार आहे.
याशिवाय लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, गांधी भवन, पंचकाई क्लब, जीएसआर टाकी, शिवणे इंडस्ट्रीज, एसएनडीटी, एएलआर, चतु:शृंगी टाकी, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल व खडकवासला-नांदेड बुस्टर पंपिंग.