Pune villages water shortage: पाणीपुरवठ्यासंदर्भात गावांमधील मिळकतींचा होणार सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:41 IST2026-04-02T10:41:12+5:302026-04-02T10:41:29+5:30
- समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्यासाठी आराखडा तयार आहे. यासाठी तीन हजार काेटी रुपयांची आवश्यकता

Pune villages water shortage: पाणीपुरवठ्यासंदर्भात गावांमधील मिळकतींचा होणार सर्व्हे
पुणे : समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर आता महापालिका प्रशासनाने गावांमधील मिळकतींचा ‘सर्व्हे ’ करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे पुढील एक वर्षाच्या आत सात गावांत महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
समाविष्ट गावांतील पाणीपुरवठ्यासाठी आराखडा तयार आहे. यासाठी तीन हजार काेटी रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम एकदम उपलब्ध हाेणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही कामे केली जातील. पुढील वर्षात सात गावांत महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जाईल. पाणीपुरवठा करण्याच्या हमीपत्रावर महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम करण्याची परवानगी दिली जात आहे. यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याविषयी आयुक्त म्हणाले, पुढील काळात या भागांत सर्व्हे करण्यात येणार आहे. संबंधित साेसायटी, गृह प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी काेणाची, हे यातून निश्चित केले जाईल.