शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Vidhan Sabha 2024 : मतदानावेळी बंद पडले ३३ ईव्हीएम; सर्वाधिक ६ इंदापुरात

By नितीन चौधरी | Updated: November 21, 2024 09:14 IST

प्रत्यक्ष मतदानावेळी ३३ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र, तर २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट बंद पडले

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान वेगवेगळ्या कारणांनी ईव्हीएम बदलण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. प्रत्यक्ष मतदानावेळी ३३ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र, तर २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट बंद पडले. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले, तर मतदानापूर्वी घेण्यात आलेल्या मॉकपोल दरम्यानही ५२ मतदान यंत्र तसेच ३१ कंट्रोल युनिट व ४७ व्हीव्हीपॅट यंत्रेही बंद पडल्याचे आढळले. राखीव यंत्रांमधून ही यंत्रे तातडीने बदलण्यात आली. त्यामुळे त्याचा मतदानावर फारसा परिणाम झाला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.ईव्हीएम, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उष्णतेला संवेदनशील असल्याने ते बंद पडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २०) प्रत्यक्ष मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वी झालेल्या मॉक पोलमध्येदेखील ही तिन्ही यंत्रे बंद पडल्याचे प्रकार समोर आले. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पहाटे साडेपाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉकपाेल घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. या दरम्यान सर्व मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांची कार्यक्षमता पडताळणी करण्यासाठी हे मॉक पोल केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर हे मॉक पोल करण्यात आले. त्यात ५२ मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम बंद पडल्याचे दिसून आले. राखीव मतदान यंत्रांमधून हे ५२ मतदान यंत्र बदलण्यात आले, तसेच ३१ कंट्रोल युनिट व ४७ व्हीव्हीपॅट यंत्रेही बंद पडल्याचे आढळले. राखीव साठ्यातून हे यंत्र बदलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वाधिक सात मतदान यंत्र भोर मतदारसंघात, तर इंदापूर मतदारसंघात ६ मतदान यंत्रे बंद पडल्याचे सांगण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५ मतदान यंत्रे बंद पडली होती. ते तातडीने बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदान ७ वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात अर्थात साडेसात वाजेपर्यंत एकही यंत्र बंद पडले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.मतदानाच्या पहिल्या चार तासांमध्ये अर्थात ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच १६ कंट्रोल युनिट व २८ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले होते. मतदानाच्या ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २७ ईव्हीएम, २१ कंट्रोल युनिट व ४७ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले होते, तर पाचपर्यंत ३१ ईव्हीएम, २५ कंड्रोल युनिट व ५४ व्हीव्हीपॅट बंद पडले होते, तर ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३३ ईव्हीएम, २६ कंट्रोल युनिट व ५६ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले. जिल्ह्यातील एकूण ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर ११ हजार ४२१ मतदान यंत्र बसविण्यात आली असून, बंद पडलेल्या मतदान यंत्रांचे प्रमाण केवळ ०.२८ टक्के आहे. राखीव मतदान यंत्रांमधून ही यंत्रे तातडीने बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले. सर्वाधिक ६ मतदान यंत्रे इंदापूर मतदारसंघात बंद पडली, तर ४ मतदान यंत्रे वडगाव शेरी मतदारसंघात बंद पडली होती. तर जुन्नर व भोर मतदारसंघात प्रत्येकी ३ मतदान यंत्रे बंद पडली. दौंड, मावळ, चिंचवड, भोसरी व हडपसर या मतदारसंघात प्रत्येकी २ मतदान यंत्र बंद पडली होती. आंबेगाव, खेड आळंदी, पिंपरी, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती व कसबा पेठ मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान यंत्र बंद पडले, तर शिरूर, बारामती, पुरंदर, कोथरूड व पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात एकही यंत्र बंद पडले नसल्याचे ईव्हीएम नोडल अधिकारी नामदेव ठिळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasaragod-pcकासारगोडkothrud-acकोथरुडbaramati-acबारामतीhadapsar-acहडपसर