Pune : नीरा येथे आढळला अनोळखी मृतदेह; मयताची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:51 IST2024-11-27T16:51:38+5:302024-11-27T16:51:38+5:30
पुणे : नीरा (ता. पुरंदर) येथे निरा नदीच्या कडेला एक अनोखी मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख मिळून ...

Pune : नीरा येथे आढळला अनोळखी मृतदेह; मयताची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
पुणे : नीरा (ता. पुरंदर) येथे निरा नदीच्या कडेला एक अनोखी मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख मिळून आली नाही. त्यामुळे या मयताची ओळख पटवण्यासाठी कोणाच्या घरातील व्यक्ती बेपत्ता असल्यास जेजुरीपोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन जेजुरीपोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार ( २६ ता ) नीरा येथील वार्ड नंबर ६ मधील स्मशान भूमीच्या बाजूला निरा नदीकाठावर एका अनोळखी पुरुषाचा मृत देह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी खात्री केली असता त्या ठिकाणी साधारण ४५ ते ५५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
त्याने अंगात जांभळा व काळा पट्टा असलेला फुल बह्याचा टीशर्ट व खाकी पॅन्ट असा पोशाख परिधान केला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला असून, याबाबतची खबर पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी पोलिसांत दिली आहे. याबाबतचा अधिकचा तपास नीरा पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार घनःश्याम चव्हाण करीत आहेत.