गरवारे महाविद्यालयाजवळ झाड कोसळले; वाहतूक कोंडी, काही नागरिक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:52 IST2025-04-08T12:51:52+5:302025-04-08T12:52:54+5:30

पुणे - गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात आज सकाळी अचानक वाऱ्याच्या जोरामुळे एक मोठं काटेरी झाड कोसळलं. या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक ...

pune Tree falls near Garware College; Traffic jam, some citizens injured | गरवारे महाविद्यालयाजवळ झाड कोसळले; वाहतूक कोंडी, काही नागरिक जखमी 

गरवारे महाविद्यालयाजवळ झाड कोसळले; वाहतूक कोंडी, काही नागरिक जखमी 

पुणे - गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात आज सकाळी अचानक वाऱ्याच्या जोरामुळे एक मोठं काटेरी झाड कोसळलं. या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, काही नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झाड कोसळण्याच्या ठिकाणी गरवारे महाविद्यालयासोबतच एक रुग्णालय आणि खाऊ गल्ली असल्याने तेथे नेहमीच मोठी वर्दळ असते. झाड कोसळल्यामुळे काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नुकसान पोहोचले आहे.  



घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू असून, नेमकं झाड कशामुळे कोसळलं याचा शोध घेतला जात आहे.  

एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सांगितले, “मी त्या वेळी जूस पित होतो. अचानक वारा आला आणि झाड पडलं. काही गाड्या त्याखाली आल्या.  सध्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: pune Tree falls near Garware College; Traffic jam, some citizens injured