Pune: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:47 IST2025-09-09T18:47:14+5:302025-09-09T18:47:29+5:30

भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता

Pune Speeding dumper hits bike 19-year-old college student dies | Pune: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Pune: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

पुणे : भरधाव डंपरच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्येमहाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालय चौकात घडली. याप्रकरणी अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित गणेश रेवले (वय १९, रा. संकेत विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित रेवलेचे भावजी कचन कराळे (४२) यांनी डंपरचालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून हडपसरमधील जेएसपीएम महाविद्यालय परिसरातून जात होता. त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार घडक दिली. या अपघातात अभिजित गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करत आहेत.

 

Web Title: Pune Speeding dumper hits bike 19-year-old college student dies