पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुसाट;वेग वाढल्याने वेळेची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:27 IST2024-12-19T09:25:28+5:302024-12-19T09:27:06+5:30

पुण्यातून तीन-साडेतीन तासांत सोलापूरला पोहोचणे शक्य होणार

Pune-Solapur rail journey will be smooth, time saving due to increased speed | पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुसाट;वेग वाढल्याने वेळेची बचत

पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुसाट;वेग वाढल्याने वेळेची बचत

पुणे :सोलापूर-दौंड दरम्यान रेल्वेगाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी दिली. यामुळे पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे.

पुणे विभागातून पुणे-दौंड दरम्यान सध्या रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावत आहे. यामुळे पुणे-दौंड प्रवास वेगात सुरू आहे. परंतु सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर दरम्यान रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाले आहे. त्यांची पाहणी महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी नुकतेच केली. सध्या दौंड-सोलापूर दरम्यान ताशी ११० किमी वेगाने रेल्वे धावतात. त्यामुळे वेळ जास्त लागतो.

पुढील काही दिवसांत रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे फायदा होणार असून मेल, एक्स्प्रेस आणि डेमू यांचा वेग वाढल्याने प्रवासातील वेळ कमी आहे. त्यामुळे पुण्यातून तीन-साडेतीन तासांत सोलापूरला पोहोचणे शक्य होणार आहे. येत्या १५ दिवसांत याची अंमलबजावणी होणार आहे.

Web Title: Pune-Solapur rail journey will be smooth, time saving due to increased speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.