शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ‘स्मार्ट सिटी’साठी मँकेंंझी करणार मदत

By admin | Updated: August 28, 2015 04:39 IST

स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम २०मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील १०० दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी

पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम २०मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील १०० दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून, त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.महापालिकेने राज्य शासनाने या संदर्भात घेतलेल्या स्पर्धेपाठोपाठ केंद्र शासनाच्या पहिल्या फेरीतील स्पर्धेतही पुण्याचा समावेश झाला आहे. परंतु, खरी स्पर्धा पुढील टप्प्यात आहे. स्पर्धेच्या नियमानुसार पुढील १०० दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांचा आणि सुविधांचा विस्तृत आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर करायचा आहे. हा आराखडा तज्ज्ञ सल्लागाराकडून तयार करून घेण्यात येणार असून, सल्लागार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याकरिता महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात मँकेंंझी या संस्थेला काम देण्यात येणार आहे. यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात हा निधी नसल्याने सांडपाणी विभागाच्या निधीतून १ कोटी ६० लाख रुपये वर्गीकरणाद्वारे देण्यात येणार आहेत.दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी ६० ते ६५ प्रश्नांची सूची केंद्र शासनाने तयार केली आहे. त्यानुसार शहरात काय सुविधा देणार, याचे नियोजन विकास आराखड्याच्या माध्यमातून सादर करायचे आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या १०० शहरांपैकी २० शहरे या वर्षी योजनेसाठी निवडली जातील. पुढील वर्षी उर्वरित ८० शहरांमधून २० शहरांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यातच शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड होण्यासाठी चांगली तयारी करण्यात येईल. तज्ज्ञ सल्लागारांसोबतच शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सूचना घेण्यात येतील.- कुणाल कुमार (महापालिका आयुक्त)