रस्ताभर पॅच-पॅच, पुण्यात मध्येच खड्डे...! त्या खड्ड्यावरून दुचाकी घसरली, दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:32 IST2025-08-01T09:32:28+5:302025-08-01T09:32:59+5:30

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने ते मागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली चिरडले गेले. हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

pune road accident Patches all over the road, potholes in the middle in Pune...! A bike fell off that pothole, the bike rider was crushed under a car | रस्ताभर पॅच-पॅच, पुण्यात मध्येच खड्डे...! त्या खड्ड्यावरून दुचाकी घसरली, दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला

रस्ताभर पॅच-पॅच, पुण्यात मध्येच खड्डे...! त्या खड्ड्यावरून दुचाकी घसरली, दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला

पुणे - शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे बळी थांबताना दिसत नाहीत. औंध येथील राहुल हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने ते मागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली चिरडले गेले. हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अधिकच्या माहितीनुसार, जगन्नाथ काशिनाथ काळे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचे नाव आहे. ते रोजप्रमाणे आपल्या दुचाकीवरून जात असताना राहुल हॉटेलसमोरील मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी घसरली. येथील रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला आहे. चिखलामुळे नागरिकांना गाडी चालवतांना मोठ्या खड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे दुचाकी घसरली, आणि दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला. ते रस्त्यावर पडताच मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.



या घटनेमुळे पुण्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि महापालिकेच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध केला असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून, संबंधित वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात दरवर्षी पावसाळ्यात खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे जीवितहानी होते. यावर प्रशासन नेहमीच आश्वासनं देत आलं आहे, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती मात्र जशीच्या तशी आहे. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठोस पावले उचलावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Web Title: pune road accident Patches all over the road, potholes in the middle in Pune...! A bike fell off that pothole, the bike rider was crushed under a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.