Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 20:16 IST2025-07-29T20:12:17+5:302025-07-29T20:16:57+5:30

Pune Rave Party Latest Update: पुण्यातील खराडीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, नवीन माहिती समोर आली आहे. 

Pune Rave Party: Rave party was to be held again in 'that' room; Police get new information from investigation | Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती

Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती

Pune Rave Party Pranjal Khewalkar: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, ज्या रुममध्ये ही पार्टी सुरू होती, तिथे प्रांजल खेवलकर हा शुक्रवारी मुक्कामी होता आणि शनिवारी दिवसभर त्या खोलीत होते. त्या रुममध्ये रविवारीही पार्टी होणार होती, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

खराडीतील स्टे बर्ड हॉटेलमधील एका किचनसह स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये ही पार्टी सुरू होती. प्रांजल खेवलकरच्या नावे दोन रुम बुक होत्या. त्यातील १०१ ही रुम एका रात्रीसाठीच बुक केलेली होती. त्यामुळे त्या रुममध्ये नेमके काय घडले? ती रुम कशासाठी बुक केली गेली होती? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

रुम १०२ मध्ये रविवारीही होणार होती रेव्ह पार्टी

पोलिसांना बुक करण्यात आलेल्या दोन्ही रुमची बिले मिळाली आहेत. त्यातील रुम नंबर १०२ ही २५ ते २८ अशी बुक करण्यात आली होती. तीन रात्रींसाठी ही रुम बुक केली गेली होती. शुक्रवारी रात्री प्रांजल खेवलकर रुममध्ये मुक्कामी होता. 

शनिवारी दिवसभर प्रांजल खेवलकर रुममध्येच होता. त्यानंतर सर्वांनी शनिवारी रात्रभर पार्टी झाली. पार्टी सुरू असतानाच सकाळी पोलिसांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली होती. या रुममध्ये रविवारी रात्रीही पार्टी होणार होती, अशी माहिती आता पोलिसांनी दिली. 

पार्टीसाठी कोकेन कोणी आणले?

पार्टी सुरू असलेल्या रुममध्ये पोलिसांना कोकेन, गांजा, हुक्का पॉट आणि दारु होती. पोलिसांना कोकेनच्या तीन पुड्या तिथे मिळाल्या. पार्टीसाठी कोकेन कुणी आणलं, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. 

Web Title: Pune Rave Party: Rave party was to be held again in 'that' room; Police get new information from investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.