Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:43 IST2025-07-27T13:41:05+5:302025-07-27T13:43:59+5:30

Pune Rave Party Latest News: पुण्यातील खराडी भागात एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. ती उधळल्यानंतर पोलिसांनी रोहिणी खडसे-प्रांजल खेवलकर यांच्या घराची झाडाझडती घेतली.

Pune Rave Party: After the rave party was disrupted, Rohini Khadse's house was searched, police found three things | Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 

Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 

Pune Vave Party Rohini Khadse News: राज्यात हनी ट्रॅप प्रकरणावरून गदारोळ सुरू असतानाच पुण्यात रेव्ह पार्टी उधळण्यात आली. पुणे शहरातील खराडी भागात एका उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हेच सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली. रेव्ह पार्टीवर धाड टाकल्यानंतर पोलिसांनीरोहिणी खडसे-प्रांजल खेवलकर यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांनी घरात सापडलेल्या ती गोष्टी जप्त केल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाच रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांना ताब्यात घेतले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. 

रोहिणी खडसे-प्रांजल खेवलकरांच्या घरात सापडल्या तीन वस्तू

पुण्यातील खराडी भागात सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील घरावर छापा टाकला. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. यावेळी एक लॅपटॉप, तीन पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क या तीन गोष्टी पोलिसांना आढळून आल्या. या तिन्ही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

रेव्ह पार्टी करणाऱ्या महिलांसह ७ जण पोलिसांच्या ताब्यात

रविवारी (२७ जुलै) पहाटे ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पुणे पोलिसांनी खराडी भागातील एका फ्लॅटवर धाड टाकली. एका उच्चभ्रू वसाहतीत हा फ्लॅट आहे. तिथे रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर महिला आणि पुरूष मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. रेव्ह पार्टी सुरू असलेल्या फ्लॅटमध्ये दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट आढळून आला. पोलिसांनी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरसह सात जणांना ताब्यात घेतले. यात दोन महिलांचा समावेश आहे. 
 

Web Title: Pune Rave Party: After the rave party was disrupted, Rohini Khadse's house was searched, police found three things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.