पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:30 IST2025-07-04T13:26:06+5:302025-07-04T13:30:10+5:30
Pune Rape Case: संगणक अभियंता असलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली. घरात घुसून हे कृत्य करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
Pune Crime News: कुरिअर कर्मचारी असल्याचे भासवून एका आरोपीने पुण्यात एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दोन संशयितांची चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून आरोपी तरुणीला आधीपासून ओळखत होता अशी माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत पीडिता संगणक अभियंता आहे. ती आणि तिचा भाऊ दोन वर्षांपासून पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहते. भाऊ काही निमित्ताने गावी गेला होता. त्यानंतर ही घटना घडली.
पेन घ्यायला वळली आणि आरोपी घरात घुसला
आरोपीने कुरिअर कंपनीचा कर्मचारी असून बँकेचे कागदपत्रे असल्याचे तरुणीला सांगितले. तिने सेफ्टी दरवाजा उघडला. सही करण्यासाठी तरुणी मागे फिरली, तेव्हा तो घरात घुसला आणि दरवाजा बंद केला.
वाचा >>मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात
त्यानंतर त्याने तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारला. तरुणी बेशुद्द झाली. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर मोबाईलमध्ये सेल्फी घेतली. याबद्दल कुणाला सांगितले तर जीवे मारेन अशी धमकी देत मी पुन्हा येईन असा मेसेज त्याने टाईप करून ठेवला होता.
पोलिसांनी दोन संशयितांची केली चौकशी
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटना परिसराची पाहणी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पथके नेमण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने तरुणीच्या नाक आणि तोंडाचे नमुने घेतले आहेत. तोंडावर मारलेला स्प्रे कोणता होता, याचीही तपासणी केली जाणार आहे.
पोलिसांनी सोसायटीतील सीसीसीटीव्हीची पाहणी केली. त्याचबरोबर गेटवरील आलेल्या-गेलेल्यांची यादीही बघण्यात आली. प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी तरुणीला आधीपासून ओळखत होता.
या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून हलगर्जीपणा केला गेला का? आरोपी इतक्या सहजपणे आतमध्ये कसा घुसला, याचीही चौकशी केली जाणार आहे.