पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेल्या तीन प्रमुख आरोपींना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. सुमारे १८ महिने तुरुंगात राहिल्यानंतर या तिघांची सुटका होणार आहे.
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने खालील तिघांना जामीन मंजूर केला आहे. यामध्ये आदित्य अविनाश सूद हा कारमध्ये मागे बसलेल्या एका मुलाचे वडील आहेत. दुसरा आशिष सतीश मित्तल, हा मुख्य आरोपीच्या वडिलांचा मित्र आहे आणि रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेणारा कथित मध्यस्थ अमर संतोष गायकवाड आहे.
सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणेजामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने काही गंभीर टिप्पणी केली आहे. आरोपी गेल्या १८ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. गुन्ह्यातील शिक्षेचा विचार करता, त्यांना अधिक काळ कोठडीत ठेवणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल, असे म्हटले आहे. तसेच न्यायमूर्ती नागरत्ना यांनी पालकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "मुलांना चैनीसाठी पैसे आणि गाडीच्या चाव्या देणे अयोग्य आहे. पालकांना मुलांसाठी वेळ नसतो आणि ते त्याची भरपाई पैशांनी करतात, हे सामाजिक वास्तव चिंताजनक आहे," असे न्यायालयाने म्हटले.
आरोपींना पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या आणि तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे.
प्रकरण काय होते?१९ मे २०२४ रोजी रात्री पुण्यात कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन बिल्डर पुत्राने सुसाट वेगात पोर्श कार चालवून दोघा आयटी इंजिनीअर्सचा (अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा) जीव घेतला होता. या अपघातानंतर मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने स्वतःच्या रक्ताशी बदलल्याचा आरोप या तिघांवर होता.
Web Summary : The Supreme Court granted bail to three accused in the Pune Porsche car accident case after 18 months in jail. They are accused of swapping blood samples to protect the minor driver involved in the fatal accident that killed two IT engineers. The court expressed concern over parental negligence.
Web Summary : सुप्रीम कोर्ट ने पुणे पोर्श कार दुर्घटना मामले में तीन आरोपियों को 18 महीने बाद जमानत दी। उन पर नाबालिग ड्राइवर को बचाने के लिए खून के नमूने बदलने का आरोप है, जिसने दो आईटी इंजीनियरों की जान ले ली थी। अदालत ने माता-पिता की लापरवाही पर चिंता व्यक्त की।