शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पुणे पोलिसांची 'सुपर' कामगिरी! १५ लाख अन्न पाकिटे, ६२ हजार धान्य किट, ५० हजार मास्क, ४९ हजार सॅनिटायझरचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 8:39 PM

लॉकडाऊनमधील पुणे पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देरेल्वे गाड्यांच्या माध्यमातून १७ हजार ८१४ व्यक्तींना गावी केले रवाना बसमधून ११ हजार १४८ व्यक्तीे परराज्याच्या सीमेवर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात रवानापोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सलग इतके दिवस मदतीचे हे सत्र सुरु

पुणे : १५ लाख १७ हजार ७८८ अन्न पाकिटे, ६२ हजार ५५७ धान्य किट, ५० हजार ८०७ मास्क, ४९ हजार २४७ सॅनिटायझऱ २३ मार्चपासून शहरात अडकलेल्या तसेच लॉकडाऊन सुरु झाल्याने उपजिविकेचे साधन नसलेल्या पुणे शहरातील सर्वस्तरातील लोकांना शहर पोलीस दलाच्या सोशल पोलिसिंग सेलकडून पुरविण्यात आलेल्या मदतीचे हे आकडे आहेत.लॉकडाऊनमध्ये २४ तास बंदोबस्ताबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, घरातच थांबावे यासाठी मदतीचा हात शहर पोलिसांनी पुढे केला आहे. 

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत पुणे शहरातील बेघर, परप्रांतीय कामगार, ईशान्य भारत तसेच परराज्यातील गरजू विद्यार्थी, तृतीयपंथीय, सेक्स वर्कर,झोपडपट्टीतील रहिवासी, मजूर वर्ग, ससून हॉस्पिटल तसेच कमला नेहरु हॉस्पिटल येथील रुग्णांचे नातेवाईक अशांना शहर पोलीस दलाकडून अन्नपाकिटे पुरविली जातात. प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे. हे काम अजूनही सुरु आहे.९ ते १७ मे दरम्यान १३ रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून १७ हजार ८१४ व्यक्तींना गावी रवाना केले. त्यांच्यासोबत तितकीच अन्न पाकिटे व पाणीबाटल्या पुरविण्यात आल्या. तसेच ४४९ बस गाड्यांमधून ११ हजार १४८ व्यक्तीेंना परराज्याच्या सीमेवर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आले. त्या सर्वांना प्रवासात खाण्यासाठी अन्न पाकिटे व पाणीबाटल्या पुरविण्यात आल्या.सोशल पोलिसिंग सेलच्या माध्यमातून अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी हेमार्गदर्शन करीत आहेत. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सुनिल दोरगे तसेचवाहतूक विभागातील २० कर्मचारी त्यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे काम करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात शहर पोलीस दलावर २४ तास बंदोबस्ताचे मोठे काम येऊन पडले असतानाही प्रथमच पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सलग इतके दिवस मदतीचे हे सत्र सुरु ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार