शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
3
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
4
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
5
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
6
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
7
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
8
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
9
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
10
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
11
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
13
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
14
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
15
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
17
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
18
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
19
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
20
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन दरीत उतरावं लागतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:02 IST

- आंबेगावच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात भीषण पाणीटंचाई; महिलांची दररोज मृत्यूशी झुंज 

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील महिलांच्या जीवनाची जणू वास्तव कहाणी बनली आहे. भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यातील दुर्गम गावांमध्ये पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगरदऱ्यांतून खडतर पायपीट करावी लागत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील कोंढवळ, आहुपे, बालवीरवाडी, तळेघर, जांभोरी, फलोदे, राजपूर यासह अनेक गावांमध्ये पिढ्यान्पिढ्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यंदा पावसाने लवकरच काढता पाय घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये एकच कुपनलिका असून, त्यातही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोंढवळ गावातील शिंदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी, केवळवाडी तसेच इतर वाडीवस्त्यांतील महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी जावे लागते. त्यानंतर अडीचशे ते तीनशे फूट खोल दरी उतरून झऱ्याजवळून हंडाभर पाणी भरावे लागते. पुन्हा तेवढीच चढण चढत डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन परतताना महिलांची अक्षरशः दमछाक होत आहे.

हंडाभर पाण्यासाठी रात्रभर नंबर लावावा लागत असून, दुसऱ्या दिवशीच पाणी मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पाय घसरला तर थेट खोल दरीत कोसळण्याचा धोका कायम डोळ्यासमोर असतो. अशा परिस्थितीत महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.

दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा धोका

डोंगरातील झऱ्यांमधून मिळणारे पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी स्वच्छतेच्या समस्या वाढल्या असून, साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो, मात्र उन्हाळ्यात आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, ही शोकांतिका कायम आहे. 

आम्ही जीवन जगायचं तरी कसं?

एकीकडे घोटभर पाणी मिळालं नाही तर मरण, आणि पाणी आणताना दरीत पाय घसरला तरी मरण.. आम्ही जीवन जगायचं तरी कसं? असा हतबल सवाल आसाणे भांगलेवाडी येथील रुख्मिणी भांगले यांनी व्यक्त केला. तर कोंढवळ येथील ज्येष्ठ आदिवासी महिला रखमाबाई वाजे म्हणाल्या, सगळं आयुष्य गेलं, पण डोक्यावरचा हंडा खाली उतरला नाही. पूर्ण दिवस घोटभर पाणी टिपण्यात जातो. आम्हा आदिवासींच्या पाचवीलाच दुष्काळ पूजला आहे.

अनेक गावांमध्ये तीव्र टंचाई

तळेघर, कोंढरे, कुशिरे, माळीण, आमडे, कोंढवळ, राजपूर, फलोदे, फुलवडे तसेच मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, डामसेवाडी, आहुपे, वनदेव, बोरघर, घोडेवाडी, आवळेवाडी, माळवाडी, असाणे, सावरली, गोहे बुद्रुक, सायरखळा, पाचवड आदी अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उन्हाचा चटका वाढत असताना दुष्काळाच्या झळाही तीव्र होत असून, आदिवासी भागातील महिलांचे जीवन अक्षरशः पाण्यासाठीच्या संघर्षात अडकले आहे. प्रशासनाने तातडीने टँकर, नवीन पाणीपुरवठा योजना आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thirsty villagers risk lives for water in drought-hit region.

Web Summary : Facing severe drought, women in Ambegaon trek miles, risking their lives to fetch water from deep valleys. Villages grapple with water scarcity, forcing residents to drink contaminated water, increasing disease risk. Urgent action is needed.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी