बारामती - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह पवार कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून अपघातामागील सत्य बाहेर यावे, ही सर्वांचीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपवली असून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट विमानांची तपासणी केली आहे. मात्र केवळ चार विमानांवर कारवाई न करता त्या कंपनीच्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवावे, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली.ते पुढे म्हणाले, विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्याची शक्यता असते. तज्ज्ञ तपासणीनंतर हा अपघात की घातपात, याचे खरे चित्र समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "दादांच्या अपघाताची बातमी मन स्वीकारत नाही. कोणाच्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये," असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. या प्रकरणात व्हीएसआर कंपनीविरोधात तक्रार देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्यासोबत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माध्यमांशी बोलतांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती, हे खरे असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही कार्यकर्ते एकत्र लढले होते. पवार कुटुंब आणि पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.पार्थ पवार आणि ‘साहेबां’च्या प्रकृतीबाबतपार्थ पवार यांना राज्यसभेची संधी मिळाल्यास आनंदच होईल, असे सांगत त्यांनी ‘साहेबां’ची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते विश्रांती घेत असल्याची माहिती दिली.
Web Title : Demand for transparent inquiry into Ajit Pawar's plane accident.
Web Summary : Yugendra Pawar demands a transparent inquiry into Ajit Pawar's plane accident. He seeks investigation into whether it was accident or sabotage. He also urges grounding of all VSR aircraft, not just four.
Web Title : अजित पवार के विमान हादसे की पारदर्शी जांच की मांग।
Web Summary : युगेंद्र पवार ने अजित पवार के विमान हादसे की पारदर्शी जांच की मांग की। उन्होंने दुर्घटना या तोड़फोड़ की जांच की मांग की। उन्होंने केवल चार नहीं, बल्कि सभी वीएसआर विमानों को ग्राउंड करने का आग्रह किया।