पुणे : राज्यभरात मतदार पडताळणी अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम सुरू असून, त्याअंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील ९१ लाख ६० हजार मतदारांपैकी तब्बल ३७ लाख ६८ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही पडताळणी राज्यात सर्वाधिक असून, त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात सुमारे ३५ लाख मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, एकूण मतदारांच्या टक्केवारीच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. गडचिरोलीसारख्या कमी मतदार असलेल्या जिल्ह्यात ७ लाख ५३ हजार अर्थात ९० टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास मान्यता दिली आहे. हा कार्यक्रम प्रत्यक्षात लवकरच सुरू होणार असला, तरी सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यात २०२५ मधील मतदार यादीची पडताळणी २००२ च्या मतदार यादीशी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातही अशी पडताळणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात २०२५ च्या मतदार यादीनुसार ९१ लाख ५९ हजार ५९८ मतदार आहेत. त्यानुसार २००२ च्या तसेच २०२५ च्या मतदार यादीत पुणे जिल्ह्यातच असलेल्या मतदारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३७ लाख ६८ लाख ९७२ अर्थात ४१.२२ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यात बारामती मतदारसंघ आघाडीवर आहे. या मतदारांना चिन्हांकित करण्यात येत असून चिन्हांकित मतदार अंतिम असल्याचे गृहित धरण्यात येतील.
राज्यातील मतदारसंघात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत टक्केवारी लक्षात घेता हे प्रमाण कमी असले, तरी एकूण ३७ लाख ६८ हजार ९७२ मतदारांनी पडताळणी पूर्ण केल्याने राज्यात पुणे जिल्हा पडताळणीत अव्वल ठरला आहे. त्यानंतर मतदारसंघाच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात ७५ लाख मतदारांपैकी ३४ लाख ९४ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातही सुमारे ५१ लाख ४८ हजार मतदारांपैकी ३३ लाख ९२ हजार, तर मुंबई उपनगरात ७८ लाख ३८ हजार मतदारांपैकी ३० लाख ४४ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक पडताळणी बारामती तालुक्यात ६७.८३ टक्के झाली आहे. त्यानंतर मावळ तालुक्यात ५९.३१, तर सर्वात कमी २४.४० टक्के पडताळणी चिंचवड मतदारसंघात झाली आहे. हडपसर मतदारसंघातही पडताळणीची टक्केवारी केवळ २६ इतकी आहे. जिल्ह्यात हडपसर व चिंचवड हे दोन मतदारसंघ मतदारांच्या संकेत संकेत मोठे असल्याने टक्केवारी तुलनेने कमी दिसत असल्याचे जाणवते.
जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी टक्क्यांमध्ये
बारामती ६७.८३
मावळ ५९.३१
कसबापेठ ५६.०१
जुन्नर ५५.९६
आंबेगाव ५४.४२
भोर ५३.९७
दौंड ५३.३३
खेड आळंदी ५२.३८
शिवाजीनगर ४८.०१
इंदापूर ४६.३२
शिरूर ४२.८६
पुणे कॅन्टोन्मेंट ३८.३६
पर्वती ३८.३५
वडगाव शेरी ३५.४८
पुरंदर ३४.२६
भोसरी ३२.४८
पिंपरी ३२.०७
कोथरूड ३१.३३
खडकवासला ३१.३१
हडपसर २६.०१
चिंचवड २४.४०
एकूण ४१.२२
बहुतांश ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शिक्षक व सरकारी कर्मचारी आहेत. आपले काम सांभाळून ते पडताळणीचे काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. पडताळणी पूर्ण झाल्यास मतदारांचे नाव यादीत पक्के झाले असे गृहीत धरण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी ही पडताळणी करून घ्यावी. - मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे
Web Summary : Pune leads Maharashtra in voter verification, completing 41% of its 9.1 million voters' review. Baramati tops talukas at 67.83%. The Election Commission urges citizen cooperation for accurate voter lists.
Web Summary : पुणे मतदाता सत्यापन में महाराष्ट्र में सबसे आगे, अपने 9.1 मिलियन मतदाताओं की समीक्षा का 41% पूरा किया। बारामती 67.83% के साथ तालुकों में सबसे ऊपर है। चुनाव आयोग ने सटीक मतदाता सूची के लिए नागरिकों के सहयोग का आग्रह किया।