शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

देशात ३१५ लाख टन, तर राज्यात १०० लाख टन साखरेचे उत्पादन, राज्यातील हंगाम समाप्तीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:39 IST

देशात यंदा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ३५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता

पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर राज्यात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता हे एकूण साखरेचे उत्पादन अनुक्रमे ३१५ आणि १०० लाख टन होईल, असे चित्र आहे. राज्यात आतापर्यंत ९८.८७ लाख टन, तर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे. राज्यात पुढील १० दिवसांत गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. देशातून यंदा सात ते आठ लाख टन साखर निर्यात, तर ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे.देशात यंदा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ३५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ३१ मार्चअखेर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या सर्वांत मोठ्या साखर उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्रात पुढीत ८ ते १० दिवसांत, तर उत्तर प्रदेशातही लवकरच हंगाम संपेल. यंदा गाळपास आलेला ऊस जवळपास संपला आहे. तर यापुढील गाळपातून साखर उतारा चांगला मिळत नाही. परिणामी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे यापूर्वी ३५० लाख टन उत्पादनाचा अंदाज आता २८३ ते २८५ लाख टनांवर आला आहे. तर अतिरिक्त ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सुरुवातीला ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यंदा एकूण २१० सहकारी व खासगी कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती. त्यापैकी १८७ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, उर्वरित २३ कारखाने पुढील ८ ते १० दिवसांत बंद होतील अशी स्थिती आहे. आतापर्यंत १ हजार ४३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून आतापर्यंत ९८ लाख ८७ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ९.४८ टक्के मिळाला आहे. सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात २३ लाख १९ हजार टन त्यानंतर पुणे विभागात २२ लाख १८ हजार टन, तर सोलापूर विभागात १९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात अंदाजित साखर उत्पादनापेक्षा १० लाख टन उत्पादन कमी होणार आहे.

उत्तर प्रदेशातही यंदा १०५ लाख साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नव्या अंदाजानुसार हे उत्पादन ९३ ते ९३ लाख टनांपर्यंतच पोचेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, यंदा देशात इथेनॉलसाठी ३५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र, नव्या अंदाजानुसार ३१ लाख टन साखर वापर इथेनॉलसाठी वापरण्यात येणार आहे. गेल्या साखर निर्यातीवर बंदी होती. यंदा केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीनुसार सात ते आठ लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar Production Estimates Down; Maharashtra's Season Nearing Completion

Web Summary : India's sugar output estimates lowered to 315 lakh tons, Maharashtra at 100 lakh. Season ends soon in Maharashtra. Export: 7-8 lakh tons; Ethanol conversion: 31 lakh tons.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे