Video : ५८ व्हिडिओंचा धक्कादायक दावा; पुरावे नष्ट होण्याची भीती; चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:22 IST2026-03-19T18:22:12+5:302026-03-19T18:22:59+5:30

- रूपाली चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती : रूपाली पाटील-ठोंबरे

pune news Shocking claim of 58 videos; Fear of destruction of evidence; Chakankar should resign immediately | Video : ५८ व्हिडिओंचा धक्कादायक दावा; पुरावे नष्ट होण्याची भीती; चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा

Video : ५८ व्हिडिओंचा धक्कादायक दावा; पुरावे नष्ट होण्याची भीती; चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा

पुणे : भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित ज्योतिषी आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात यांच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेत्या रूपाली पाटील -ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत रूपाली पाटील -ठोंबरे म्हणाल्या, हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नाही, हा पूर्णपणे महिलांचा विषय आहे. एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची वाचा फुटली होती. तरीही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या ट्रस्टवर असल्यामुळे पोलिस कारवाई होत नव्हती का? ५८ व्हिडिओ सापडले आहेत, म्हणजे किमान ५८ महिलांवर अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे.

रूपाली चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट करण्याची भीती आहे. सर्व संबंधित ट्रस्टवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. जर रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. मी हा विषय सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालणार आहे. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीमुळे तपास प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, असे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title : दुर्व्यवहार वीडियो दावों के बीच रूपाली चाकणकर से इस्तीफे की मांग।

Web Summary : रूपाली चाकणकर से राज्य महिला आयोग से इस्तीफा देने का आग्रह किया गया है। आरोपों में दुर्व्यवहार के आरोपी एक स्व-घोषित ज्योतिषी शामिल हैं। अगर वह पद पर बनी रहती हैं तो सबूतों से छेड़छाड़ की आशंका जताई गई है। निष्पक्ष जांच की मांग की गई है।

Web Title : Rupali Chakankar faces resignation calls amid abuse video claims.

Web Summary : Rupali Chakankar is urged to resign from the State Women's Commission. Allegations involve a self-proclaimed astrologer accused of abuse. Concerns raised about evidence tampering if she remains in office. An impartial investigation is demanded.