रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 06:15 IST2026-05-09T06:15:35+5:302026-05-09T06:15:57+5:30

गुरुवारी ब्लॉकची माहिती देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी दुपारी ३:५० ते ५:५० दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. याबाबत एक एसएमएस, प्रसिद्धीपत्रक किंवा स्थानकांवर उद्घोषणाही करण्यात आली नसल्याचे कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.

Railways' 'mega' chaos! No notification or announcement; Kasara route blocked for second consecutive day; Passengers cry out | रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश

रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश

Marathi News :  डोंबिवली, खर्डी : मध्य रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ८) प्रवाशांना आला. कोणतीही पूर्वसूचना न देता कसारा-आसनगावदरम्यान मेगाब्लॉक घेतल्याने हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

गुरुवारी ब्लॉकची माहिती देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी दुपारी ३:५० ते ५:५० दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. याबाबत एक एसएमएस, प्रसिद्धीपत्रक किंवा स्थानकांवर उद्घोषणाही करण्यात आली नसल्याचे कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका

ऐन गर्दीच्या वेळी कसारा लोकल आसनगाव स्थानकातच रद्द करण्यात आल्याने कसारा, इगतपुरी, घोटी येथे जाणारे प्रवासी अडकून पडले.  आसनगाव ते कसारादरम्यान कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था न केल्याने प्रवाशांना खासगी वाहनांसाठी अवाच्यासव्वा भाडे मोजावे लागले.  त्यामुळे प्रवासी संतप्त झाले.

या आहेत मागण्या

विनासूचना ब्लॉक घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. अडकलेल्या प्रवाशांना झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासाबद्दल रेल्वेने जाहीर माफी मागावी.

यापुढे कोणताही ब्लॉक घेताना किमान ४८ तास आधी प्रवाशांना माहिती देणे बंधनकारक करावे. ब्लॉक काळात आसनगाव ते कसारा दरम्यान मोफत एसटी बससेवा सुरू करावी.

जर रेल्वे प्रशासनाने या मनमानी कारभारात सुधारणा केली नाही, तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही कल्याण- कसारा-कर्जत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिला.  दरम्यान, स्थानकांवर एकही रेल्वे अधिकारी प्रवाशांना मार्गदर्शनासाठी उपस्थित नव्हता.

Web Title : रेलवे में अफरा-तफरी: बिना सूचना कसारा मार्ग बाधित, यात्री परेशान

Web Summary : मध्य रेलवे द्वारा बिना सूचना के कसारा मार्ग पर मेगा ब्लॉक के कारण यात्रियों को लगातार दूसरे दिन भारी परेशानी का सामना करना पड़ा। पूर्व सूचना और वैकल्पिक परिवहन की कमी के कारण यात्रियों में आक्रोश है और जवाबदेही की मांग की जा रही है।

Web Title : Rail Chaos: Unannounced Block Disrupts Kasara Route, Passengers Anguished

Web Summary : Central Railway's unannounced mega block on the Kasara route caused severe disruption for passengers for the second consecutive day. Commuters faced hardship due to the lack of prior notice and absence of alternative transport, leading to widespread anger and demands for accountability.

टॅग्स :railwayरेल्वे