शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पोलिसांपासून पळालो, मॅरेथॉनमध्ये धावलो अन् व्यसनांपासून सुटलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:12 IST

जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेतला, तेव्हा त्या पोलिसांपासून पळण्याचा उपयोग मॅरेथॉन धावण्यासाठी झाला अन् अमली पदार्थाच्या व्यसनातून कायमचा सुटलो... हा अनुभव पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील तरुण राहुल जाधव यांनी सांगितला.

-अमृत देशमुखपुणे : मुंबईला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे लवकर पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी मुंबईच्या गुन्हेगारी टोळीच्या संपर्कात आलो अन् अमली पदार्थ सेवनाचे व्यसन लागले. तेव्हा पोलिसांपासून पळू लागलो. जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेतला, तेव्हा त्या पोलिसांपासून पळण्याचा उपयोग मॅरेथॉन धावण्यासाठी झाला अन् अमली पदार्थाच्या व्यसनातून कायमचा सुटलो... हा अनुभव पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील तरुण राहुल जाधव यांनी सांगितला.

अलीकडच्या काळात अमली पदार्थांचे व्यसन हे सर्व देशांसाठी भयंकर समस्येचे कारण बनले आहे. १६ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलेदेखील अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागली आहेत. हेरॉइन, एमडी गांजाचे प्रमाण सेवन करण्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज गैरवापर आणि अवैध तस्करीविरोधी दिनानिमित्त राहुल जाधव यांनी त्याची अमली पदार्थांच्या विळख्यातून यशस्वीपणे बाहेर पडल्याची कहाणी उलगडली.

राहुल म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना बरीच वर्षे मुंबईच्या गुन्हेगारीत होतो. त्याचदरम्यान अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन लागले. मग पोलिसांनी पकडले. जेलमध्ये चार वर्षे होतो. तिथून सुटल्यानंतर अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक वाढले. त्यामुळे नोकरी मिळत नव्हती. कोणी चांगली वागणूक देत नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून घरच्यांनी पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती केले, इथे आल्यावर असे लक्षात आले की, एक महिन्याचा उपचार पुरेसा नसून बराच काळ उपचार घ्यावे लागणार आहेत. मग मी निर्णय घेतला की अजून काही काळ उपचार घ्यायचेच.

मुक्तांगणमध्ये स्वच्छतेचे काम करायला लागलो. स्वच्छतागृहाची साफसफाई करत असताना माझ्या मनाचीच स्वच्छता झाली. मनातील राग, द्वेषसारखी जळमटे नाहीशी झाली. पुढे एक ते दीड वर्ष मुक्तांगणमध्ये उपचार घेत असतानाच पुण्यामध्ये मॅरेथॉनचे आयोजन झाले होते. त्यात मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

पोलिस माझ्या मागे लागायचे, त्यामुळे मी खूप वेगात धावायचो. पोलिसांना मला कधीच पकडता आले नाही. त्याचा चांगला फायदा झाला आणि पहिल्याच मॅरेथॉनमध्ये मी तब्बल दहा किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. त्यानंतर मुक्तांगणमध्येच धावण्याचे प्रशिक्षण घेऊन अधिक मॅरेथॉनमध्ये तरबेज झालो. २१ किमी, ४२ किमीची मॅरेथॉन मी सहज धावू लागलो. दरम्यान, मुंबईला पोलिसांकडे हजेरी लावायला जावे लागत असताना तिथे मला अपमानित केले जायचे. त्यामुळे मी मुंबईच्या ४२ किमी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्या मॅरेथॉनमधील फोटो आणि मिळालेले मेडल्स पोलिसांना दाखविले. तेव्हा पोलिसांनी माझे खूप कौतुक केले. त्यावेळी लक्षात आले की, माझी ओळख एक धावपटू म्हणून होऊ शकते, याच आत्मविश्वासाने मी पुढे अनेक मॅरेथॉन धावलो.

राहुल जाधव हा आमच्याकडे दाखल झाला. तेव्हा त्याची परिस्थिती भयानक होती. त्यातून यशस्वीरीत्या अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडून तो आता अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहे. २०१९ मध्ये गेटवे ऑफ इंडिया ते इंडिया गेट म्हणजेच मुंबई ते दिल्ली वीस दिवस धावला. आता तो मुक्तांगणसह विविध कारागृहात, गावोगावी जाऊन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. शिबिर घेऊन अमली पदार्थ सेवन मुक्तीसाठी जनजागृती करतो. - डॉ. मुक्ता पुणतांबेकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यPoliceपोलिस