Pune Crime : नशेली पानांवर पोलिसांचा धडक छापा;‘मैफील पानशॉप’मधून १.९० लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:23 IST2026-03-15T14:22:43+5:302026-03-15T14:23:58+5:30

- कदमवाकवस्ती परिसरात दोन जणांना अटक; शैक्षणिक संस्थांजवळ नशेच्या पानांचा वाढता विळखा चिंताजनक

pune news police raid on drug paraphernalia seized illegal drugs worth Rs 1.90 lakh from Mayfeel Paanshop | Pune Crime : नशेली पानांवर पोलिसांचा धडक छापा;‘मैफील पानशॉप’मधून १.९० लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : नशेली पानांवर पोलिसांचा धडक छापा;‘मैफील पानशॉप’मधून १.९० लाखाचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात खुलेआम विकल्या जाणाऱ्या नशेली पानांच्या व्यवसायावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली विरोधी पथक क्र. २ ने शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील ‘मैफील पानशॉप’वर अचानक छापा टाकत दोन जणांना अटक केली. या कारवाईत अंमली पदार्थमिश्रित २६६.४ ग्रॅम पान, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात दुकानमालक निशांत दत्तात्रय काळभोर (वय १९, रा. बाजार मळा, लोणी काळभोर) आणि कामगार रामजी संतोष पटेल (वय ३३, मूळ रा. जि. बांदा, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर रोहित जवळकर (रा. लोणी काळभोर) हा आरोपी फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि मोबाईल टेस्टिंग मशीनच्या सहाय्याने तपास केला असता खाण्याच्या पानांमध्ये ॲम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथाम्फेटामाइन या धोकादायक अंमली पदार्थांचे मिश्रण करून नशेली पाने विकली जात असल्याचे उघड झाले.  ३५ रुपयांत मिळणाऱ्या या एका पानाची नशा दारूच्या एका बाटलीइतकी भीषण असल्याचे समोर आले आहे.

हे उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरातील अनेक पानटपऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, ही कारवाई खूप उशिरा झाली आहे. पूर्व हवेली परिसरात सुमारे २०० हून अधिक ठिकाणी नशा देणारी पाने विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ही दुकाने पुणे-सोलापूर महामार्गालगत, चौकाचौकात तसेच हॉस्टेल, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या पानांच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या नशेली पानाची किंमत साधारण ३५ रुपये असून, ते खाल्ल्यानंतर दारूच्या बाटलीइतकी नशा होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या पानाला दारू किंवा गुटख्यासारखा वास नसल्यामुळे पालकांना मुलांनी नशा केल्याचे लगेच लक्षात येत नाही. परिणामी अनेक कुटुंबांमध्ये नकळत तरुण पिढी व्यसनाच्या दलदलीत अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे. 

Web Title : नशे वाले पान पर पुलिस का छापा; ₹1.9 लाख का माल जब्त।

Web Summary : पुणे पुलिस ने नशीले पान के कारोबार का भंडाफोड़ किया, दो गिरफ्तार, ₹1.9 लाख के पान और सामग्री जब्त। पान में एम्फ़ैटेमिन जैसे खतरनाक पदार्थ थे, जो तेज़ नशा देते थे, स्कूलों के पास उपलब्धता के कारण माता-पिता और स्थानीय लोग चिंतित हैं।

Web Title : Police raid on drug-laced betel leaves; ₹1.9L seized.

Web Summary : Pune police busted a drug-laced betel leaf operation, arresting two and seizing ₹1.9L worth of laced leaves and materials. The leaves contained dangerous substances like amphetamine, offering a strong high, alarming parents and locals due to its accessibility near schools.