पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:38 IST2026-02-17T12:29:16+5:302026-02-17T12:38:16+5:30

काँग्रेस पक्षाकडून केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले.

pune news Police biasedly excluded the mayors name from the crime; Congress will take out a march for the resignation of the police commissioner | पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा 

पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा 

पुणे : भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर केलेल्या हल्ल्यापूर्वी महापौर मंजूषा नागपुरे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी चिथावणीखोर भाषणे करून कार्यकर्त्यांना हल्ला करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी काँग्रेस पक्षाकडून केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले. याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने काँग्रेस भवनासमोर रविवारी (दि.१५) आंदोलन केले. हे आंदोलन हिंसक होत दगडफेक झाली. यात कार्यकर्ते, पोलिस, पत्रकार जखमी झाले. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. काँग्रेस भवनावर आंदोलनासाठी भाजपला पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ काँग्रेसने बैठक घेतली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, नगरसेवक प्रशांत जगताप, गटनेते चंदूशेठ कदम, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर केलेल्या हल्ल्यापूर्वी महापौर मंजूषा नागपुरे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी चिथावणीखोर भाषणे केली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन व कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. याप्रकरणी केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले. पोलिसांच्या या कृतीविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच पोलिसांनी भाजपला काँग्रेस भवनाजवळ आंदोलन करण्यास परवानगी देत हल्ल्यास हातभार लावला. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 पोलिस प्रशासनाने भाजपच्या आंदोलकांना काँग्रेस भवनात शिरण्यासाठी अप्रत्यक्ष मदत केल्याचे दिसून येते. आमच्यावर दगडफेक होऊनदेखील आमच्यावरच गुन्हे दाखल होतात. खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.  - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

Web Title : कांग्रेस का आरोप, हिंसा के बाद पुलिस पक्षपात, आयुक्त के इस्तीफे की मांग

Web Summary : कांग्रेस का आरोप है कि हिंसा मामले में महापौर का नाम हटाने के लिए पुलिस पक्षपातपूर्ण है। वे पुलिस आयुक्त के इस्तीफे के लिए विरोध प्रदर्शन की योजना बना रहे हैं और मामले के संबंध में उच्च न्यायालय में अपील करेंगे।

Web Title : Congress alleges police bias, demands commissioner's resignation after violence.

Web Summary : Congress accuses police of bias for omitting Mayor's name in violence case. They plan a protest for police commissioner's resignation and will appeal to the high court regarding the matter.